अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगांव(प्रतिनिधी)-दि 24 नोहेंबर च्या रात्री 12 वाजे पासून ते 2 वाजून 30 मिनिटां पर्यंत स्वतः आमदार साहेबांनी स्टिंग ऑपरेशन करत पोलीस खात्यातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट कार्याचा पर्दाफाश केला
आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्याची सर्वत्र दिवस भर चर्चा सुरू होती,तसेच सोशल मीडियावर देखील स्टिंग ऑपरेशन च्या व्हिडीओ ने धुमाकूळ घातला होता, आपल्या कार्याने जनतेत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे आमदार चव्हाण
आमदार मंगेश चव्हाण आपल्या बेधडक कार्याने प्रसिद्ध असून नेहमीच चर्चेत असतात रात्री 12 ते 2.30 वाजेपर्यंत स्वतः घाटात जात एक अवजड वाहन चालवत सहकाऱ्यांच्या मदतीने घाटात होत असलेली अवजड वाहन चालकांची आर्थिक पिळवणूक सोशल मीडिया द्वारे जनतेच्या समोर आणली आहे,स्वतः आमदार चव्हाण यांनी स्वतः 500 रुपये देत थोडे कमी करण्यास सांगितले मात्र पैसे परत न दिल्याने जवळ उभ्या असलेल्या पोलीस कर्मचऱ्यास पैसे परत देत नसल्याचे सांगितले यावर पोलीस कर्मचाऱ्याने अरेरावी ची भाषा करत निघण्यास सांगितले आमदार चव्हाण यांनी गाडीतून खाली उतरत चेऱ्यावरील रुमाल काढताच पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला,एकीकडे शहर पोलीस स्टेशन चे निरीक्षक कायद्याच्या चौकटीत राहून शिस्त बद्ध कार्य करत आहे मात्र काही ग्रामीण पोलीस कर्मचारी पोलीस प्रशासनाची प्रतिमा मालिन करत आहे, मात्र सर्व प्रकरणात कश्या प्रकारे मोठया वाहन चालकांची आर्थीक अडवणूक केली जाते,काही ग्रामीण पोलीस कर्मचारी कश्या प्रकारे अरेरावी ची भाषा वापरतात,कश्या प्रकारे काही ग्रामीण पोलीस कर्मचारी भ्रष्टाचार करत आहेत जनते समोर आणत भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांची तक्रार जिल्हा अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांची भेट घेत सर्व हकीकत सांगत कारवाई करण्याची मागणी केली असून कर्मचाऱ्यांवर अधिकारी काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे आमदार चव्हाण यांचे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे मात्र घाटावरची परिस्थिती बदलणार का की पुन्हा जैसे थे परिस्थिती होणार? आमदार चव्हाण यांनी जसे सत्य समोर आणले त्याच प्रमाणे पाठपुरावा करत पुढे काय कारवाई होते याकडे लक्ष देत घाटात पुन्हा अश्या प्रकारे वाहन चालकांची अडवणूक होणार नाही याच्यावर सुद्धा कायम स्वरूपी उपाययोजना करायला हवी.