चाळीसगाव(प्रतिनिधी दि 24) काल रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत मा.पोनि विजयकुमार ठाकूरवाड सो यांचे आदेशाने व आगामी सण व उत्सवांचे काळात कायदा व सुव्यवस्था रहावी याकरिता सपोनि मयूर भामरे, पोहेका संभाजी पाटील, पोलीस अंमलदार संदीप भोई, भूषण पाटील व सतिष राजपूत असे रात्रपाळी गस्त करीत असताना, रात्री 3:05 वाजताचे सुमारास चाळीसगाव भडगाव रोडवरील कॅप्टन कॉर्नर जवळ दोन इसम त्यांचे पल्सर मोटारसायकलवर भरधाव वेगाने जाताना दिसले, त्यांना अडवून त्यांची अंगझडती व वाहन झडती घेतली असता त्यांचे अंगावर 3 मोबाइल, रक्कम रुपये 720 व वाहनांच्या सीटच्या खालच्या बाजूस एक अंदाजे 2 फूट लांबीची लोखंडी तलवार, काळ्या रंगाची बजाज पल्सर मोटारसायकल असा एकूण 97220 रुपयांचा ऐवज मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन, संचारबंदी व कोरोना रोगाचा प्रसार होणारी हयगयीची व घातकी कृती केली म्हणून तसेच हत्यारबंदी कायद्याचे जाणीवपूर्वक उल्लंघन व महाराष्ट्र पोलीस कायंदा कलम 37 (१)(अ) अन्वये दोन आरोपितांविरोधात पोनि ठाकूरवाड सो यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
आरोपी हे पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून, त्यांचेवर यापूर्वी देखील चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हे नोंद आहेत.
आरोपीची नावे-
१. अमोल छगन गायकवाड, वय- २२ वर्षे, राहणार- स्वामी समर्थ कॉलनी, नागद रोड, चाळीसगाव.
२. धनंजय बाळासाहेब भोसले, वय- २० वर्षे, राहणार- स्वामी समर्थ कॉलनी, नागद रोड, चाळीसगाव.