हातरस घटनेतील आरोपींना फाशी द्या-दलित पँथर चाळीसगाव शाखा व मानवहित लोकशाही पक्ष चाळीसगाव च्या वतीने निवेदन

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे

चाळीसगाव(प्रतिनिधी)-आज दि 9 ऑक्टोबर 2020 शुक्रवार रोजी दलित पँथर व मानवहित लोकशाही पक्षा च्या वतीने हातरस घटनेतील आरोपींना फाशी द्यावी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा या मागण्यांचे निवेदन चाळीसगाव तहसीलदार अमोल मोरे यांना देण्यात आले हातरस(उत्तरप्रदेश) येथे एक मुलीचा बलात्कार करून अमानुषपणे जीभ कापण्यात येथे काही दिवस मृत्यूशी झुंज देत मुलीचा मृत्यू होतो रात्रीत प्रेत जाळले जाते अश्या प्रकारे अन्याय केला जातो या प्रकरणे संपूर्ण देश हादरला आहे तरी सदर प्रकरण फास्टट्रक कोर्टात लढवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी जेणे करून पुन्हा असा प्रकार घडणार नाही व सदर घटनेची जबाबदारी स्वीकारत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे दलित पँथर व मानवहित लोकशाही पक्ष चाळीसगाव च्या वतीने करण्यात आली तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन देण्यात आले व आमच्या मागण्या भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या पर्यंत पोहचविण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली दलित पँथर च्या निवेदनावर संजय गुरुदत्त निकम तालुकाअध्यक्ष,नवनाथ अर्जुन जाधव कार्याध्यक्ष,विजय अशोक गवळी सचिव,रोहित अमृत निकम तालुकाउपाध्यक्ष,सय्यद मुज्जमील सैय्यद वजीर तालुकाउपाध्यक्ष,प्रा गौतम निकम,राजकुमार मोरे,न्याणेश्वर जाधव,मुकेश नेतकर,समाधान मोरे,निला जगताप आदींच्या सह्या आहेत. तसेच मानवहित लोकशाही पक्ष चाळीसगाव च्या निवेदनावर तालुकाध्यक्ष गजानन श्रीपत चंदनशिव,तालुका संपर्क प्रमुख गोकुळ प्रसाद,तालुका संघटक दिलीप रमेश चांदणे,शहराध्यक्ष बापू कांबळे,समाजसेवक राजामामा राखपसरे,शाहीर वाल्मिक फासगे,युवराज राखूडे,रमेश शिरसाठ,बाळू खरात,दिलीप साबळे,अनिल गायकवाड,रवींद्र साबळे,भरत नेटारे आदींच्या साह्य आहेत