
हाथरस घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करा- चाळीसगाव शिवसेना महिला आघाडीचे तहसिलदारांना निवेदन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव – उत्तर प्रदेश येथील हाथरस घटनेतील आरोपींना कठोरात कठोर कारवाई करा असे निवेदन चाळीसगाव महिला शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज चाळीसगाव तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडे देण्यात आले.उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यातील दलित परिवारातील 19 वर्षीय मुलीवर काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी अमानुष बलात्कार केला ते गावगुंड फक्त बलात्कार करून शांत बसले नाही तर तिचे हाडेही तोडली गेली. ती ह्यात नसली तरी मृत्यूआधी पोलिसांना दिलेल्या जबानीत सर्वकाही कथन केले आहे त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्या गाव गुंड प्रवृत्तीच्या युवकांना अटकही केली. असल्या गाव गुंड प्रवृत्तीच्या नराधमांना कायद्याने फास्टट्रॅक न्यायालयात दाखल करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी असे निवेदन आज दि 5 ऑक्टोबर 2020 सोमवार रोजी चाळीसगाव महिला शिवसेनेच्या आघाडीच्या वतीने देण्यात आले.यावेळी उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाने, तालुका संघटक सुनील गायकवाड, जगदीश महाजन, संजय ठाकरे, शैलेंद्र सातपुते, अनिल राठोड, दिलीप पाटील, रामेश्वर चौधरी, सागर पाटील, बापू लेनेकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सविता कुमावत, शुभांगी कुमावत, स्मिता सोनवणे, ज्योती गवळी, निर्मला मोरे, मनीषा महाजन, सोनाबाई कोळी, रंजना पाटील, मनीषा कोळी, नकुल बाई पाटील, मंगलबाई सूर्यवंशी, उषाबाई कोळी, उज्वला कोळी ललिता कावडे, शितल आहिरे, सुनीता साळुंके, ज्योती गवळी, सपना सोनवणे आदी शिवसैनिक, महिला कार्यकर्ता, पदाधिकारी उपस्थित होते.
Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
Average Rating