हिना मेश्राम मृत्यूप्रकरणी वसतीगृह प्रशासनातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी-गौतम कांबळे

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
शहर प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-हिना मेश्राम या इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार करून निर्घूण खून करण्यात आला . याला वसतिगृह प्रशासन जबाबदार आहे . त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,हिना मेश्राम या विद्यार्थिनीच्या मृत्यूची तात्काळ चौकशी करून गुन्हेगारांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा .हिना मेश्राम ही विद्यार्थिनी कम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण बांद्रा पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती .शिक्षणासाठी वसतिगृहात राहणाऱ्या या मुलीवर पाशवी अत्याचार करून तिचा निर्गुण खून करण्यात आला .ही घटना पुरोगामी महाराष्ट्रात मानवतेला डाळिंबा फासणारी आहे . त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून वसतिगृह प्रशासनाच्या विरोधात विद्यार्थिनीच्या हत्तेला जबाबदार असल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा व तातडीने अटक करण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे .निवेदनाच्या प्रती
मुख्य सचिव महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई व
प्रधान सचिव गृह विभाग महाराष्ट्र शासन यांनाही मेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत .यावेळी राज्य महासचिव विठ्ठल सावंत उपस्थित होते .