Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

१४ भुईकोट किल्ल्यांवरती शौचालय बांधण्यासाठी शासनाने काढला जी आर,संतप्त शिवभक्तांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर जी आर ची होळी…

0 0
Read Time4 Minute, 10 Second

संपादक गफ्फार शेख(मलिक)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगाव(प्रतिनिधी)- राज्य सरकारला गड किल्ल्यांचे संवर्धन व जतन करता येत नाही पण ३ जिल्ह्याच्या १४ गड किल्ल्यांवरती शासनाने शौचालय बांधायचा जी आर काढल्याने शिवभक्तामध्ये या विरोधात संतपाची लाट असून राज्य सरकारने शिवभक्तांच्या भावना भडकविण्याचे काम केले आहे. १४ भुईकोट गट किल्ल्यांवरती शौचालय बांधण्याचा शासनाने काढलेल्या जी आर तात्काळ मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्री यांना करण्यात आली आहे. चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर जी आर ची शिवभक्तांच्या वतीने दि २३ रोजी होळी करण्यात आली.
गट किल्ल्यांवरती शौचालय बांधण्याचा शासनाने जी आर काढल्याने शिवभक्त राज्यात एकाही मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही,छत्रपती शिवाजी महाराजांचे आर्शिवाद घेऊन राज्य करायचे आणि महाराजांनी स्वराज्यात उभे केलेल्या गडकिल्ल्यांचा जाज्वल्य इतिहास धुळीस मिळविण्याचा मनसुबा आखायचा हा ढोंगीपणा शासनाच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यानी बंद करावा तुमचे खरे चेहरे आता उघडे पडले आहे, सांस्कृतीक मंत्री मगलप्रभात लोढा यांची हिम्मत ऐवढी वाढली की ते थेट ३ जिल्ह्यातील १४ भुईकोट किल्ल्यांवरती शौचालय बांधायला निघालेत . घेतलेला निर्णय निषेधार्थ असून राज्य सरकारचा करावा तेवढा निषेध कमीच आहे, शासन ठरवून छत्रपती शिवाजी महाराजांचा व त्यांनी निर्माण केलेल्या गडकिल्ल्यांचा विध्वंस करायला निघाले आहे,शासनाचे कटकारस्थान शिवरायांचे मावळे कदापी सफल होऊ देणार नाही. शासनाच्या सांस्कृतिक विभागाने काढलेला जी आर तात्काळ मागे घ्यावा अन्यथा राज्यातील शिवभक्त आक्रमक आंदोलन करतील याची झळ शासनाला बसल्याशिवाय राहणार नाही,शासनाच्या सांस्कृतिक विभागाने काढलेला जी आर मुख्यमंत्री यांनी तात्काळ मागे घ्यावा अन्यथा राज्यातील शिवभक्त राज्यभर आक्रमक आंदोलन करतील असा इशारा शासनाला चाळीसगाव येथील शिवभक्तांनी दिला आहे. याप्रसंगी गणेश पवार ,खुशाल पाटील ,विजय ( पप्पू )पाटील,मनोज भोसले ,किशोर पाटील ,विलास मराठे, भरत नवले ,तमाल देशमुख,दिनेश गायकवाड मुकुंद पवार ,सचिन शिंदे, ज्ञानेश्वर कोल्हे ,सतीश पवार, दीपक देशमुख, अनिल कोल्हे, छोटू अहिरे, पी एन पाटील, आर बी जगताप प्रदीप मराठे, ज्ञानेश्वर शिंदे ,विलास गवळी,दिलीप पाटील, विलास भोसले ,प्रमोद वाघ ,सुनील देशमुख, सचिन गायकवाड, ईश्वर पवार ,गणेश गोसावी, दीपक नागणे, संजय चित्ते, किरण पवार ,दत्तु पवार,योगेश पवार, विकास पवार ,अण्णासाहेब धुमाळ ,योगेश देशमुख, सचिन पवार ,मनोज देशमुख, संजय पाटील, तसेच सोनाली लोखंडे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: Content is protected !!
%d bloggers like this: