दौंड-दौंड तालुक्यातील नगरपालिका हद्दीमधील रा.रा.पो.बल गट.क्र.७ दौंड तालुका दौंड जिल्हा .पुणे.नगरपालिका हद्दीत कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्याने.मोठी खळबळ उडाली असता दौंड येथील काही भाग प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आला असून हा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीस वायरस चे संक्रमण होते त्याच अनुषंगाने काही भाग प्रतिबंधित व बफर म्हणून घोषित केले असून.कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे गरजेचे असल्याने.दौंड शहर व बिगर नगरपालिका हद्द गोपाळवाडी,माळवाडी, मसनरवाडी, लिंगाळी पवार वस्ती,व दळवी मळा(सोनवडी),भवानी नगर व भोंगळे मळा(गिरीम)हे मुख्यस्थान धरून ३ किलोमीटर चा परिसर प्रतिबंधित क्षेत्र व मेरगळ वाडी, खोरवडी, नानविज पोलिस प्रशिक्षण केंद्र, तव पुनर्वसन गावठाण, जाधववाडी(गिरीम)सोनवडी परिसर मुख्यस्थानी धरून ५ किलोमीटर चा परिसर क्षेत्र बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून अशी माहिती मा:प्रमोद गायकवाड(उपविभागीय दंडाधिकारी दौंड-पुरंदर) यांनी दिली.
दौंड प्रतिनिधी
कु:पवन साळवे