८ वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित नागरिकांचा येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्काराचा इशारा

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-चाळीसगाव शहराबाहेरील रस्त्यांनी कात टाकलेली असतानाच शहरातील उपनगरातील रस्त्यावरुन नागरिकांना पायी चालणे देखील कठिण होऊन बसले आहे,प्रभाग १५ मधील नविन पाण्याच्या टाकी परिसरातील मदनी नगर येथील नागरिक ८ वर्षांपासून रस्ते,गटारी व दिवाबत्तीपासून वंचित असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे, विद्यार्थी,महिला यांना पायी चालणेही कठिण होऊन बसलेले आहे,सायकली,मोटर सायकली गा-यात अडकून पडत आहेत,महिला व लहान मुले पाय घसरुन पडण्याची शक्यता असून अनेकदा नगरपालिकेत या बाबतीत तोंडी व लेखी निवेदन देऊनही काहीच फरक पडत नसल्याने नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत,भावी नगरसेवक आश्वासनां व्यतिरिक्त इकडे फिरकत पण नाही त्यामुळे,नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनीच आता नगरपरिषदेचा रस्ते कर, दिवाबत्ती कर,सांडपाण्याची व्यवस्था आदि कर भरणाऱ्या नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांकडे (स्वंयघोषित समाजसेवक व भावी नगरसेवक लक्ष देत नाही म्हणून)आपण स्वतः लक्ष देऊन या मदनी नगर भागातील नागरिकांच्या रस्ते,गटारी व दिवाबत्ती या मूलभूत समस्या सोडवाव्यात, तरीही समस्या सुटतच नसतील खासदार श्री.उन्मेष पाटील व आमदार श्री. मंगेश चव्हाण यांनी स्वतः या कामाकडे लक्ष देऊन आपल्या निधीतून ते पूर्ण करुन नागरिकांची गैरसोयीतून मुक्तता करावी अन्यथा येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत या भागातील मतदार आपल्या नातेवाइकांसह मतदानावर बहिष्कार टाकतील याची भावी नगरसेवकांनी नोंद घ्यावीच असे अजिज खाटीक,रशिद मनियार,साबीर शेख,अनिस मन्सुरी,जहिर शेख,मुश्ताक सैय्यद,नविद शेख,आसिफ शेख,जाकिर शेख,फिरोज कादरी,इस्माईल पठाण,राजू शेख,मुख्तार शेख,नासिर शेख,सलिम शेख,फिरोज खान,शब्बीर शेख,अयाज शेख आदिंनी सूचक इशारा देत कळविले आहे.