संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
भडगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील कजगाव रेल्वे स्थानकावरून हॉस्पिटलच्या कामानिमित्त जळगांव साठी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास नाशिक भुसावळ पॅसेंजर ने जाणाऱ्या कनाशी येथील महिला प्रवासी यांची पर्स घाई गडबडीत खाली पडली होती.रेल्वे सुरू झाल्याने हातास होत.ती पर्स मिळणार नाही याची खात्री झाली असताना,रेल्वे लाईंचे काम करणारे साईट इंजिनियर यांनी आधार कार्डच्या आधारे त्यांच्या परिवारास संपर्क साधत पर्स त्याच्या स्वाधीन करत दिला प्रामाणिकतेचा संदेश.
याबाबत वृत्त असे की कनाशी येथील सविता राजेंद्र पुजारी या महिला प्रवासी हॉस्पिटलच्या कामानिमित्त कजगाव नाशिक – भुसावळ येथून रेल्वेने जळगाव येथे जाण्यासाठी रेल्वे स्टेशनला आले असता रेल्वेत बसण्याच्या घाई गडबडीत त्यांची बॅग कजगाव रेल्वे स्टेशनवर पडली,गाडी गेल्यावर रेल्वेच्या तिसऱ्या लाईनचे काम करणारे साईट इंजिनियर सुमित कुमार यांनाही पर्स मिळाली. त्यांनी हे पर्स उघडली असता त्यात पैसे व आधार कार्ड व इतर महत्वाची कागदपत्रे होती. आधार कार्ड वरून संबंधितांच्या परिवारास कनाशी येथे संपर्क साधून, ओळख पटवून महिलेचे पती राजेंद्र पुजारी यांनाही पर्स, पैसे, कागदपत्रे तपासून त्यांना परत देण्यात आली.
पर्स परत करताना साईट इंजिनियर सुमित कुमार,पोइसमन अंकुश बारी,पत्रकार अमीन शाह,पोइसमन विनोद हिरे हे उपस्थित होते.पर्स मधील पैसे व कागदपत्रे यांची खातरजमा करून राजेंद्र पुजारी यांनी त्यांचे आभार मानले.या प्रामाणिक कार्यामुळे साईट इंजिनियर सुमित कुमार यांच्या प्रामाणिक पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
