अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी सनी घावरी
पिंपरी (प्रतिनिधी)-:- पिंपरी कोरोनाकाळातील मानधन तत्वावर सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानधन तत्वावर कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे यासाठी कोरोना योद्धा बचाव कृती समितीच्या वतीने गेली 12 दिवस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोर आंदोलन चालू आहे.या आंदोलनास रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे सर यांच्या आदेशानुसार पाठिंबा देण्यात आला.यावेळी संस्थेचे राज्य महासचिव संतोष शिंदे,राज्य सचिव नीरज भालेराव,पिंपरी चिंचवड शहर संघटक अमोल गायकवाड,शहर समनव्यक प्रमोद लोंढे,भोसरी विभाग प्रमुख मयूर जगताप,आयुश करमले उपस्थित होते.
