संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहर पोलिसांची गुन्हेगारांवर करडी नजर,वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपीस जिल्हाधिकारी जळगांव यांचे एम पी डी ए अंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश प्राप्त होताच चाळीसगाव शहर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेत नागपूर कारागृह येत स्थानबद्ध करण्यासाठी रवाना केले असून नवीन वर्षात ही पहिली एम पी डी ए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील दानिश शेख असलम वय-29 वर्षे रा.नागदरोड, चाळीसगांव जि. जळगांव याच्या विरूध्द चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन गैरकायद्याची मंडळी, मारहाण करून लोकांकडुन दमबाजी करुन पैसे वसुल करणे व इतर गुन्हे दाखल होते. त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येवून देखील त्याच्या स्वभावात बदल झालेला नव्हता.तसेच शरीराविरूध्द गुन्हे केलेले होते त्यास वेळोवेळी गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आल्यानंतर त्याने मा.न्यायालयातुन जामीनावर सुटल्यावर सुध्दा पुन्हा-पुन्हा गुन्हे केलेले होते. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बाधा निर्माण होवून गावांतील लोकांच्या मनात असुरक्षितेची भावना तयार झाली होती. दिवसें-दिवस वेगवेगळ्या त-हेने गुन्हे करण्याची त्यांची प्रवृत्ती बळावत असल्याने सर्व सामान्य लोकांसाठी तो उपद्रवी बनला होता.
त्यामुळे त्याचे विरूध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हात भट्टीवाले औषधी विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कालाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणा-या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबत अधिनियम सन-1981 नुसार धोकादायक व्यक्ती या संज्ञेत मोडत असल्याने त्याचे विरूध्द सदर कारवाई करणे आवश्यक होते. त्यानुसार मा. पोलीस अधिक्षक सो. जळगांव यांचे आदेशानुसार मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे दानिश शेख असलम याचे विरूध्द पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी व विनोद पाटील, पो.हे.कॉ भुपेश वंजारी यांनी प्रस्ताव तयार करून पोलीस अधिक्षक यांचेकडेस पाठविला होता. सदर प्रस्तावाची पडताळणी करून मा. पोलीस अधिक्षक सो, जळगांव यांनी मा. जिल्हाधिकारी सो. जळगांव यांच्या कार्यालयात पाठविला होता. त्यानुसार दिनांक-07 जानेवारी 2025 रोजी मा. जिल्हाधिकारी सो. जळगांव यांनी एम पी डी ए कायद्याअंतर्गत दानिश शेख असलम यांस स्थानबध्द करण्याचे आदेश काढले.त्याअनुषंगाने दिनांक-14 जानेवारी 2025 रोजी त्यास ताब्यात घेवुन ठाणे मध्यवर्ती कारगृह,नागपुर जिल्हा-नागपुर येथे पोलीस उप निरीक्षक अरुण बाविस्कर व पोकॉ समाधान पाटील,प्रविण लोहार,विलास पवार अश्यांनी नागपुर कारागृह येथे दाखल करणेकामी रवाना करण्यात आले आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी,ग्रेपोउपनिरीक्षक कैलास पाटील, सुभाष पाटील, पो.हे.कॉ. विनोद पाटील,भुपेश वंजारी पोना दिपक पाटील अशांचा सहभाग होता.
