जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गालापूर(एरंडोल) येथे क्रीडा सप्ताह उत्साहात प्रारंभ.
Read Time1 Minute, 7 Second
एरंडोल(गालापूर)प्रतिनिधी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापूर येथे दिनांक १२ ते १८ डिसेंबर क्रीडा सप्ताह उत्साहात प्रारंभ झालेला असून आज कवायत व धावणे मुलींचा गट मुलांचा गट छोटा गट मोठा गट व मुला-मुलींचा एकत्रित गट यामध्ये स्पर्धा संपन्न झाल्या. सर्व विद्यार्थी पालक व पालकांचा उस्फुर्त सहभाग लाभला. जीवनात तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे असून व्यायामाचे व खेळाचे महत्व शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांनी स्पष्ट केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भिल,नवरतन भील,सुभाष भिल, सुनील भिल, राकेश माळी सीमा सोनवणे, रेखा भील आदी उपस्थित होते.