चाळीसगाव(प्रतिनिधी):- कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संचार बंदी लागू करण्यात आली आहे या संचार बंदी मध्ये गरीब कुटुंबाचे हाल होऊ नये म्हणून दारूल कजा फाउंडेशन,अली ग्रुप व अनाज बँक चाळीसगाव यांच्या वतीने गरीब कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले धान्य वाटप करण्यासाठी हैदर अली यांनी 20000 हजार रुपयांची मदत केली धान्य वाटप करण्यासाठी हैदर अली,नाझीमोद्दीन काजी,अदील चाऊस,अय्युब भाई, राजु भाई,नदीम भाई ,रमजान खाटीक आदी उपस्थित होते.

