Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

नववधूचा खुन करणाऱ्याला फाशी द्या शिवसेनेची मागणी

0
1 0
Read Time4 Minute, 18 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

तालुका प्रतिनिधी प्रशिक कदम

चाळीसगाव येथे शिवसेना महिला आघाडी तर्फे तहसीलदार अमोल मोरे यांना वैष्णवी नारायण गोरे रा. मंठा जि. जालना या नवविवाहित व तिचा कुटुंबाला न्याय मिळावा हि मागणी करण्यात आली ,
शिवसेनेच्या वतीने निवेदन सादर केले
जालना जिल्ह्यातील मंठा या गावात वैष्णवी नारायण गोरे या मुलीच्या एका नराधमाने दिवसाढवळ्या भर रस्त्यात खून केल्याची घटना घडली. दुर्दैवाची बाब म्हणजे तिच्या पाच दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. लग्नानंतर पहिल्यांदा ती माहेरी आली होती. तिचे वडील रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत होते आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबीची आहे. अशा परिस्थितीत त्यांनी मुलीचे लग्न केले लग्नानंतर पाच दिवसांनी त्यांना आपल्या मुलीच्या दुर्दैवी अंत बघावा लागला. आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक मुलीला सुरक्षितता वाटली पाहिजे प्रत्येक स्त्री ला निर्भयपणे जगता आले पाहिजे असा कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित होणे गरजेचे आहे. अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी हे लोकप्रतिनिधी महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री मा उद्धव साहेब ठाकरे व पालक मंत्री मा गुलाबरावजी पाटील याचांकडे तिला व तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी करणार आहेत.
शिवसेना तालुका चाळीसगाव व महिला आघाडी वतीने पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहे.
1) वैष्णवी गोरेंच्या खुनाचा पोलीस यंत्रणेद्वारा निष्पक्ष कोणतीही त्रुटी न राहता कमीत कमी वेळात तपास पूर्ण करून माननीय न्यायालयात खटला दाखल करणे.
2) हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करणे.
3) तज्ञ सरकारी वकिलांची नेमणूक करणे.
4) पोलीस स्टेशनला मुलींचे छेडखानी बाबत तक्रार आल्यास त्याची त्वरित दखल घेणे व कार्यवाही करणे.
5) निर्भया पथकाची जास्तीत जास्त संख्येने स्थापना करणे व मुलींमध्ये निर्भयता जागृती जागृती निर्माण करणे.
आम्ही शिवसेना महिला आघाडी व पदाधिकारी या घटनेचा निषेध करत , संबंधित आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे , या गोष्टी ची ताबडतोब कार्यवाही न केल्यास सर्व नारी शक्तिने या पुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
यावेळी उपस्थित महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख प्रतिभा पवार चाळीसगाव,उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील,जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील ,तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाने, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड ,एसटी कामगार सेनेचे रघुनाथ कोळी ,उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, शाखाप्रमुख रामेश्वर चौधरी, बापू लेनेकर ,दिनेश विसपुते, सोनू महाजन, संगीता साळुंखे आदी उपस्थित होते

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: