Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

पंपिंग दुरुस्ती च्या कामामुळे गुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा विस्कळीत व शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

0
0 0
Read Time3 Minute, 54 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी सनी घावरी

पुणे(प्रतिनिधी)-गुरुवार दिनांक ०७/०१/२०२१ रोजी पर्वती जलकेंद्र पंपींग, रॉ वॉटर पंपींग, तसेच लष्कर जलकेंद्र, एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपींग येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे
कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पुणे शहराच्या भागाचा पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तसेच शुक्रवार दिनांक ०८/०१/२०२१ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे ही विनंती.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग-पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती,पद्मावती,इंदिरानगर पंपींग)- शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन,
मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परीसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई,कात्रज,धनकवडी, इंदिरानगर परीसर, कर्वे रोड ते एस. एन. डी. टी. परीसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर,डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर,सर्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर,पर्वती टँकर भरणा
केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र. वडगांव जलकेंद्र परिसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगांव, धायरी, आंबेगांव पठार, दत्तनगर
धनकवडी, कात्रज ,भारती विद्यापिठ परिसर, कोंढवा ब्रु इत्यादी. चतुःश्रृंगी /एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र परीसर :-पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतुःश्रृंगी परिसर, गोखले नगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधान, बाणेर, चांदणी चौक इ. परिसर किष्किंदा नगर,रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परीसर, महात्मा
सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे युनिर्व्हसिटी परीसर, वारजे हायवे परीसर, वारजे माळवाडी, रामनगर,अहिरेगाव, पॉप्लयुलर नगर, अतुल नगर, शाहु कॉलनी, वारजे जलशुध्दीकरणाचा परीसर, औंध बावधन, सुस, सुतारवाडी, भुगाव रोड परीसर इत्यादी.
लष्कर जलकेंद्र भाग :- लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला
रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परीसर,
विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौसींग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदन नगर,खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.
नवीन होळकर व चिखली पंपींग भाग :- विद्यानगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड परीसर इत्यादी .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: