अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी दानिश मनियार(बहाळ)
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील बहाळ गावातील ग्रामपंचायत कार्यालयातील लिपिकावर लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाई नंतर आता बहाळ ग्रामपंचायतने त्या लीपिकास बडतर्फ केले आहे.
पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्या पथकाने दि.२८ डिसेंबर २०२४ नुसार शांताराम तुकाराम बोरसे, लिपीक, ग्रामपंचायत बहाळ ता. चाळीसगांव जि जळगाव यांनी गोपाल केशव पाखले वय ७० वर्ष रा.वाणी गल्ली, मारुती मंदिराजवळ, करावे बहाळ ता. वाळीसगांव जि जळगाव यांचे गट नबर ५७/२, क्षेत्र २. हे. ६४ आर पैकी ०१ हे. ६४ आर अशी मालकी कब्जे वहिवाटीतील शेतजमीनीवर ग्रामपंचायत बहाळ हे त्याचा हक्क दाखवुन सदरची जागापरस्पर इतर व्यक्तीस भाडेतत्वावर देण्याची शक्यता असल्याने तक्रारदार यांनी मा. दिवाणी न्यायालयाकडुन ग्रामपंचायत बहाळ यांचे विरुध्द कायम स्वरुपी मनाई हुकुम आणला होता. त्यानंतर सरपंच राजेद्र महादु मोरे यांनी तक्रारदार यांना भेटून तक्रारदारास त्याच्या शेतजमीनी बाबत कोर्ट कचे-यांचा त्रास होवू द्यायचा नसेल तर शेतजमीनीतुन दर हजार चौरस फुटांचा प्लॉट त्यांना खरेदी करून दयावा लागेल असे तक्रारदारास सांगीतले त्यास तक्रारदाराने नकार दिल्याने सरपंच राजेंद्र मोरे यांनी दहा लक्ष रुपये द्यावे लागतील अन्यथा ग्रामपंचायतीकडुन तक्रारदारास कोर्ट कचे-यांचा त्रास सहन करावा लागेल असे सांगितले
सदर सरपंच राजेंद्र मोरे व लिपीक शांताराम बोरसे यांनी दिड हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करुन देण्याच्या स्वरुपात लाचेची मागणी करतांना दहा लाख लाचेची मागणी तडजोड करून पाच लाख रुपयाची लाच स्विकारण्याचे ठरले.त्यानंतर दि.२६ डिसेंबर २०२४ रोजी मोजे बहाळ रथाचे येथे तक्रारदार यांचे घरी दोनलाख रुपये तक्रारदार यांचेकडुन खाजगी इसम सुरेश ठेंगे यांचे मार्फत लाच स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले आहे. शांताराम बोरसे, लिपीक, ग्रामपंचायत बहाळ ता. चाळीसगांव यांचे विरुध्द मेहुणबारे पोलीस स्टेशन जि. जळगांव गु.र.नं.३२१/२०२४ दि.२६ डिसेंबर २०२४ रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७. ७ (अ) व १२ प्रमाणे दि.२६ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांच्या सुमारास गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्याकामी शांताराम बोरसे, लिपीक, ग्रामपंचायत बहाळ ता. चाळीसगांव यांना दि.२६ डिसेंबर २०२४ रोजी अटक करण्यात आली असल्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक, मेहुणबारे पोलीस स्टेशन ता. चाळीसगांव जि. जळगांव याचे गु.र.नं.३२१/२०२४ अन्वये कळविण्यात आलेले आहे. सदर घटनेमुळे जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीची प्रतिमा मलीन झालेली आहे.यामुळे शांताराम बोरसे, लिपीक, ग्रामपंचायत बहाळ ता. चाळीसगांव यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ प्रकरण ५ मधील कलम ६१ मधील तरतुदी नुसार व ग्रामपंचायत मासिक सभा दि. २७ डिसेंबर २०२४ रोजीच्या ठराव क्र.५/३नुसार प्रदान केलेल्या अधिकारानुसार ग्रामपंचायत बहाळ येथील लिपीक पदावरुन दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी पासुन बडतर्फ करण्यात येत असल्याचे पत्र बहाळ ग्रामपंचायत कार्यालयाने दिले आहे.
