अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस अखेर अटक केली आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे CCTNS गुन्हा क्र. 288/2025 भा.न्या. संहिता कलम 74, 309(4), 115(2), 352, 351(2)(3), 3(5) प्रमाणे दिनांक 07 मे 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी आशिक बेग असलम बेग उर्फ बाबा काल्या, रा. खडका रोड, भुसावळ हा घटनेनंतर फरार होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधीक्षक जळगाव डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आरोपीचा शोध घेऊन त्यास तातडीने अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. शरद बागल, पो.उप.नि. रवी नरवाडे व त्यांच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली होती.
दि. 27 ऑगस्ट रोजी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी आशिक बेग असलम बेग उर्फ बाबा काल्या फैजपूर येथील हॉटेल हॉटस्पॉट मध्ये आल्याचे समजताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फैजपूर पोलिसांच्या मदतीने छापा टाकून आरोपीस ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील तपासासाठी त्यास भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनकडे सोपविण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पो.उप.नि. शरद बागल, पो.उप.नि. रवी नरवाडे, पोहेकॉ. गोपाळ गव्हाळे, पोहेकॉ. उमाकांत पाटील, पोकॉ. विकास सातदिवे, पोकॉ. प्रशांत परदेशी, पोकॉ. राहुल वानखेडे (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) तसेच फैजपूर पो.स्टे.चे सपोनि. रामेश्वर मोताळे,पो.उप.नि.मैनुद्दीन सैय्यद, पोकॉ. जुबेर शेख यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
