अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला जाग आली आहे .याविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की ,पाच महिन्यांपासून प्रलंबित असलेला कै.हरी काळे यांच्या वारस पत्नीला देय रक्कमेचे यामध्ये फरक बील, मेडीकल बील,गटविमा इ. विषयांबाबतचे प्रस्ताव करमाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी तात्काळ सोलापूर जिल्हा परिषदेला सादर करण्याच्या सूचना लेखी पत्राद्वारे सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ.किरण लोहार यांनी दिलेल्या आहेत .
जि . प .प्राथमिक शाळा कावळवाडी बदली प्रकरणातील शिक्षकाची सुनावणी मंगळवार दिनांक ३० ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ४:०० मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि प सोलापूर यांच्या निजी कक्षात होणार आहे .या सुनावणीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी स्वतः हजर राहणार आहेत .या सुनावणी वेळी या शाळेतील तीनही उपशिक्षक व करमाळा पंचायत समितीचे आजी माजी गटशिक्षणाधिकारी उपस्थित राहणार आहेत .महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या मागणीची दखल घेतल्याबद्दल राज्य महासचिव विठ्ठल सावंत व राज्य सल्लागार दिगंबर काळे यांनी प्रशासनाचे आभार मानले .यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष कृष्णा काळेल व महासचिव आनंद बनसोडे , जिल्हा उपाध्यक्ष रतन शिवशरण , विठोबा गाडेकर ,बाळासाहेब भिसे , जिल्हा कोषाध्यक्ष शंकर लोणकर व जिल्हा कार्याध्यक्ष अनिल कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .
जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेबाबत
जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत ३ वर्षे अवघड क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांची काही कारणास्तव इतर अवघड क्षेत्रात बदली झाली असली तरी सलग तीन वर्षे कालावधी ग्राह्य धरण्यात यावी व बदली प्रक्रियेत या अवघड क्षेत्रातील शिक्षकांना संधी उपलब्ध करून देण्यात यावी .अवघड क्षेत्रातील सुरुवातीच्या शाळेवरील रुजू तारीख बदलीसाठी ग्राह्य धरण्यात यावी या राज्यध्यक्ष गौतम कांबळे यांनी केलेल्या मागणीला यश आले आहे .याबाबतचे ग्रामविकास विभागाचे पत्र दिनांक २६ ऑगस्ट २०२२ रोजी निघाले आहे . शासन परिपत्रक काढल्याबद्दल ग्रामविकास विभागाचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत .
