Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

मुख्याध्यापकांची रिक्त पदे लवकरच भरणार- आयुष प्रसाद

0
0 0
Read Time2 Minute, 37 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली व विविध प्रश्नांवर चर्चा केली .यावेळी बोलताना मुख्याध्यापकांचे रिक्त पदे लवकरच भरणार असल्याचे आश्वासन त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली .आपसी जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची सेवा जेष्ठता यादी जाहीर करणे . पदवीधर शिक्षकांची पदांवनती करने .जिल्हा बदलीने जिल्हा परिषदेमध्ये रुजू झालेची तारीख हीच शाळेवरची रुजू तारीख धरणे, आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रियेचे नियोजन अंतिम टप्प्यात या प्रश्नावर चर्चा करण्यात आली .सुगम व दुर्गम क्षेत्र निश्चित करण्यासंदर्भातील बैठक दोन-तीन दिवसात होणार असून सुगम व दुर्गम क्षेत्राच्या याद्या जाहीर करण्यात येतील . यावर आक्षेप घेण्यासाठी आठ दिवसाची मुदत देण्यात येणार आहे .बिंदूनामावलीचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण करून घेण्यात येईल असे आश्वासन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले .यावेळी राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत सलवदे ,राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे , राज्य उपाध्यक्ष संतोष ससाने , पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद चव्हाण , जिल्हा महासचिव मिलिंद थोरात, हवेली तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड, महासचिव कन्हैया गौड, पुणे महापालिका अध्यक्ष कैलास थोरात इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: