Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

‘राष्ट्रीय बालिका दिवस’ निमित्त न्यु इंग्लीश स्कुल (ज्युनियर कॉलेज), शिरसगांव(चाळीसगाव) येथे शिबीर संपन्न..

0
0 0
Read Time3 Minute, 44 Second

संपादक गफ्फार शेख(मलिक)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगाव(प्रतिनिधी)-माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशाप्रमाणे दि.११ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘राष्ट्रीय बालिका दिवस’ निमित्त तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव, तालुका वकील संघ चाळीसगाव आणि राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि. चाळीसगाव संचलित न्यु इंग्लीश स्कुल (ज्युनियर कॉलेज) शिरसगांव, ता. चाळीसगाव यांचे संयुक्त विद्यमाने अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव श्री.एन.के.वाळके यांचे अध्यक्षतेखाली शिबीर घेण्यात आले. सर्व प्रथम मान्यवरांचे हस्ते सरस्वती यांच्या प्रतिमेचे पुजन केले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थींनीनी स्वागत गीत सादर केले. श्री.वाय.आर.सोनवणे, प्राचार्य न्यु इंग्लीश स्कुल (ज्युनियर काॅलेज) शिरसगांव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. श्री.निलेश एस. माेरे, शिक्षक, न्यु इंग्लीश स्कुल (ज्युनियर काॅलेज) शिरसगांव यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. श्री.रमेश सुधाकर पोतदार, पी.एल.व्ही. तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव यांनी ‘राष्ट्रीय बालिका दिवस’ वर आधारीत कविता सादर केली. श्री.सचिनकुमार भुपेंद्र दायमा, पी.एल.व्ही. तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव यांनी ‘राष्ट्रीय बालिका दिवस’ या विषयावर मार्गदर्शन केेले तसेच त्यांनी सावित्रीबाई फुले, श्रीमती. प्रतिभाताई पाटील, श्रीमती द्रोपदी मुर्म, कल्पना चावला, पी.टी.उषा यांचे उदाहरणाह माहिती दिली. तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव श्री.एन.के.वाळके यांनी आपले अध्यक्षीय भाषणात उपस्थित विद्यार्थींनी यांच्याशी संवाद साधून त्यांना सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन केले. सदर शिबीरात शाळेतील शिक्षक वृंद व विद्यार्थींनी उपस्थित होते. तालुका विधीसेवा समिती तर्फे कार्यक्रमाचे आयोजन श्री.डी.के.पवार,वरिष्ठ लिपीक व श्री. तुषार भावसार, शिपाई यांनी पाहिले. अॅड.श्री.साहेबराव बी. पाटील, नोटरी भारत सरकार, संचालक राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि. चाळीसगाव यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनींचे आभार व्यक्त केेले व कार्यक्रमाची सांगता केली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: