Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

लोकअदालतीत ६२० प्रकरणे निकाली काढत ७५ लाख ७२ हजार १३९ रुपयांची वसुली

0
0 0
Read Time3 Minute, 32 Second

संपादक गफ्फार शेख(मलिक)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगाव(प्रतिनिधी)-राष्ट्रीय लोक अदालत दि. ०९ डिसेंबर २०२३ शनिवार रोजी मे. दिवाणी व फौजदारी न्यायालयात मा.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव व वकिल संघ चाळीसगाव यांचे सयुक्त विद्यामानाने चाळीसगांव न्यायालयात वादपुर्व प्रकरणांच्या कर्ज व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या निपटा-याकरीता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश, व. स्तर चाळीसगांव श्री. एन. के. वाळके, सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर तथा न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चाळीसगाव श्री. एस.डी.यादव, नायब तहसिलदार चाळीसगाव श्री. जितेंद्र धनराळे, उपाध्यक्ष वकीलसंघ चाळीसगाव अॅड. एच.एल. करंदीकर, खजिनदार वकीलसंघ चाळीसगाव श्रीमती एन.एम. लोडाया, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.आय.आर.जाधव, अॅड.एम.एन.पाटील तसेच पॅनल मेंबर्स अॅड. एस.पी.महाजन, अॅड. आकाश पोळ, पी.एल.व्ही. श्री.रमेश सुधाकर पाेतदार व श्री. देवेश दिपक पवार व न्यायालयीन कर्मचारी, श्री. डी.के. पवार, श्री एस.पी.सोनजे, श्री. डी. टी. कु-हाडे व श्री. तुषार भावसार व इतर न्यायालयीन कर्मचारी यांनी लोकन्यायालयाचे कामकाज पुर्ण केले.

सदरील राष्ट्रीय लोकन्यायालयात दाखल पुर्व ७३९६ इतके प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी ५७८ इतके प्रकरणे निकाली काढण्यात येवुन त्याबाबतची वसुली रक्कम रु.३१,९९,७३२/- इतकी करण्यात आली. त्याच प्रमाणे चाळीसगांव न्यायालयातील एकुण दाखल असलेले दिवाणी व फौजदारी प्रकरणे १०८५ पैकी ४२ इतके निकाली काढण्यात आले त्या बाबतची वसुली रक्कम रु.४३,७२,४०७/- इतकी करण्यात आली. अशाप्रकारे एकुण ६२० प्रकरणे निकाली व एकुण वसुली रु. ७५,७२,१३९/- करण्यात आली.

तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश, व. स्तर चाळीसगांव श्री. एन. के. वाळके, यांनी म. गटविकास अधिकारी, पंचायत समिती चाळीसगांव, सर्व सहा. अभियोक्ता चाळीसगांव, सर्व बॅंक अधिकारी, नगर पालिका अधिकारी, म.रा.वि.म. अधिकारी, सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी होणे करीता सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: