Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बिबट्यावर उपचार करण्यासाठी 6 तास केलेले प्रयत्न अयशस्वी,अपघातात जखमी बिबट्याचा अखेर मृत्यू

0
0 0
Read Time3 Minute, 3 Second

संपादक गफ्फार मलिक(शेख)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगांव(प्रतिनिधी)-दिनांक २७ जानेवारी २०२३ रोजी मिळालेल्या माहितीनुसार मौजे पिलखोड शिवारात चाळीसगाव – मालेगाव रस्त्यावर बिबट प्राणी अज्ञात वाहनाच्या धडकेने जखमी अवस्थेत असल्याची माहिती रात्री ८ वाजून ३० च्या सुमारास वनपरिक्षेत्र कार्यालय चाळीसगाव यांना प्राप्त झाली.माहिती प्राप्त होताच तात्काळ सर्व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट प्राणी रस्त्यालगत असलेल्या श्री. वाल्मिक पुंडलिक पवार यांच्या मका पिकाच्या शेतात जखमी अवस्थेत असल्याचे आढळून आले. बिबट प्राणी उपचारासाठी जेरबंद करणे कामी वनकर्मचारी यांचेकडून सलग ६ तास शर्थीचे प्रयत्न करण्यात आले परंतु सदर बिबट वनकर्मचारी यांचेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. अखेरीस या बिबट प्राण्यास जेरबंद करतांना रात्री ३ वाजेच्या सुमारास तो मक्याच्या शेतात मृत अवस्थेत आढळून आला. तद्नंतर पशुवैद्यकीय अधिकारी श्री. भट यांनी त्यास मृत घोषित केले. सदर कार्यवाही श्री. विवेक होशिंग, उपवनसंरक्षक जळगाव, श्री. सुदर्शन शिसव, सहा. वनसंरक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती शितल नगराळे, वनपरिक्षेत्र अधिकारी चाळीसगाव, मानद वन्यजीव रक्षक श्री. विवेक देसाई, श्री. राजेश ठोंबरे, जि. एस. पिंजारी, आर. व्ही. चौरे, श्री. जाधव, एस. बी. चव्हाण, वाय. के. देशमुख, के. बी. पवार, आर. आर. पाटील, आर. बी. पवार, सी. व्ही. पाटील एम. पी. शिंदे, एस. एच. जाधव, ए. एन. महिरे, अमित पाटील, एस. एच. जाधव, बाळू शितोळे, भटू अहिरे, श्रीराम राजपूत, दिनेश कुळकर्णी, राहुल मांडोळे, समाधान मराठे यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली. पोलीस निरीक्षक मेहुणबारे श्री. आव्हाड व पोलीस कर्मचारी देखील यावेळी उपस्थित होते. दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी बिलाखेड येथील राखीव वनात सदर बिबट प्राण्याचे शवविच्छेदन पूर्ण करून शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: