Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

सोशल मीडियावर खोटी माहिती पसरविल्यास कायदेशीर कारवाही-विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र सायबर

0
2 0
Read Time4 Minute, 59 Second

दौंड-(पवन साळवे)विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र सायबर 32 वा मजला,जागतिक व्यापार केंद्र परेड मुंबई 400005 सध्या जगात सगळीकडे पसरणारा व धुमाकूळ घालणारा कोरोना व्हायरस(covid-19)हा विषाणू आपल्या भारतात व महाराष्ट्र राज्यात जलदगतीने पसरत आहे.कोरोना व्हायरस(covid-19)विषयी खोट्या बातम्या आणि अफवा पसरविण्यासाठी विविध समाजमाध्यमांचा उदा:फेसबुक, टिक टॉक, ट्विटर, इन्स्टग्राम, यु ट्यूब,व अन्य प्लँटफ्रॉमचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.महाराष्ट्रातील covid-19 ची परिस्थिती पाहता महाराष्ट्र सायबर कार्यालय covid-19 विषयी खोट्या बातम्या आणि अफवा पसरविणाऱ्या विरोधात अडव्हायजरी जारी करत आहे.महाराष्ट्र सायबरच्या असे निदर्शनास आले आहे कि समाजतील काही विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीचे घटक समाजमाद्यमाद्वारे,मुद्दाम खोट्या बातम्या व अफवा पसरवून समाजात व नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करीत हवं समाजात शांतता भंग करून अराजकता पसरविण्याचे प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र सायबर अडव्हायजरीद्वारे सर्व नागरिकांना आशा प्रकारच्या कृत्यामध्ये सहभागी न होता त्यापासून दूर राहण्याचे अहवाहन करीत आहे.जेणेकरून समाजात भीती व दहशतीचे वातावरण पसरण्यास आणि गंभीर समस्या निर्माण होण्यापासुन प्रतिबंध होईल.तसेच सर्व टीव्ही चॅनल्स, सर्व वृत्तपत्रे यांना महाराष्ट्र सायबर विनंती करते की,कोरोना व्हायरस संदर्भातील कोणतीही माहिती खातरजमा करूनच प्रसारित करावी.नागरिकांनी अफवा पसरविण्याऱ्या लोकांच्या तक्रारी जवळच्या स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये किंवा www. cybercrime.gov.in यावर नोंद करावी. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य,मुंबई. यांची दिनांक-१४/०३/२०२० ही रोजीची The Maharashtra covid-19 Regulations 2020 ही अधिसूचना जाहीर केलेली आहे.त्यानुसार कोणतीही व्यक्ती/संस्था कोरोना व्हायरस covid-19 बाबत खोट्या बातम्या अगर अफवा पसरवताना आढळल्यास त्यांना The epidemic diseases act,1897 च्या कलम 03 अन्वये नमूद केल्याप्रमाणे जबाबदार धरले जाईल सदरचे कृत्य भारतीय दंडसहिता 1860 च्या कलम 188 अन्वये दंडनीय अपराध असल्याचे समजले जाईल. या अधिसूचनेचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची सूचना महाराष्ट्र सायबर कडून करण्यात येत आहे.महाराष्ट्र सायबर या अधिसूचनेद्वारे सर्व नागरिकांना विनंती करीत आहे,की कोरोना व्हायरस (covid-19) संदर्भातील फक्त अधिकृत माहिती व बातम्यांवरच विश्वास ठेवावा.अशी माहिती खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.आरोग्य मंत्रालय भारत सरकार. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाची खालील अधिकृत वेबसाईट कोरोना(covid-19)या विषाणू विषयी माहिती. प्रवासी सल्लामसलत.सुरक्षितता, उपाय मार्गदर्शक तत्वे आणि इतर उपयुक्त माहितीशी संबंधीत असलेल्या कार्ये आणि त्याबद्दल सविस्तर माहिती प्रदान करते.https://www.mohfw.gov.in/ जागतिक आरोग्य संघटना(WHO) जगातील आरोग्य संघटनेची खालील अधिकृत वेबसाईट कोरोना व्हायरस covid-19 या विषाणू विषयी सर्व माहिती उपलब्ध आहे . https://www.who.int/emergencies/diseases/novel-coronavirus-2019 सर्व नागरिकांनी अहवाहन आहे की त्यांनी सदर संकेतस्थळावर(website)ला भेट देऊन त्यावरील कोरोना व्हायरस बाबत नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे व खबरदारी घेण्याचे उपाय वाचून सदर उपाय अमलात आणावे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: