Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

१९ फेब्रुवारी २०२१ला शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार संभाजी सेनेच्या शिष्टमंडळाला नगराध्यक्षांचे आश्वासन

0
1 0
Read Time3 Minute, 49 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे


चाळीसगाव तालुक्यातील समस्त शिवप्रेमींची अस्मिता असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा बहुप्रतिक्षित पुतळा व्हावा या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून संभाजी सेनेने रचनात्मक असा लढा अविरतपणे दिलेलाच आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक ३ जुलै २०२० रोजी नगर परिषदेमध्ये सर्वसाधारण सभा असल्याने संभाजी सेनेने अगोदरच रितसर आंदोलनाचे पत्र देऊन आंदोलन करण्याचा नियम निर्णय घेतलेला होता आंदोलनासाठी संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लक्ष्मण शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली संभाजी सैनिक नगरपरिषद इमारतीमध्ये प्रवेश करताच सर्वप्रथम पोलिसांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला परंतु संभाजी सेनेची आंदोलनाचे ठाम भूमिका पाहून पोलिसांनी त्यांना उपनगराध्यक्ष यांच्या दालनात नजरकैदेत ठेवले जवळपास तीन तास स्थानबद्ध करून ठेवल्या नंतरही संभाजी सेनेची आंदोलनाची भूमिका कायम असल्याने पोलिसांनीच नगराध्यक्षांना विनंती केली आणि संभाजी सेनेच्या शिष्टमंडळाची बैठक घडवून आणली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय असल्याकारणाने नगराध्यक्ष सौ आशालता चव्हाण या देखील सुरु असलेली सर्वसाधारण सभा सोडून नगराध्यक्षांच्या दालनात आल्या प्रसंगी चर्चा करताना संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी त्यांची आंदोलनाबाबत ची भूमिका मांडून छत्रपती शिवरायांचा पुतळा येत्या शिवजयंती दिनी म्हणजे १९ फेब्रुवारी २०२१ पर्यंत झालाच पाहिजे अशी ठाम मागणी केली त्यावर बोलताना नगराध्यक्ष आशालता चव्हाण यांनी देखील पुतळ्या बाबतच्या आजपर्यंतच्या प्रशासकीय स्तरावर सुरू असलेला हालचालींचा लेखाजोखा सांगितला आणि येत्या शिवजयंतीला म्हणजे १९ फेब्रुवारी २०२१ ला निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आपण लोकार्पण करू असे आश्वासनही त्यांनी संभाजी सेनेला दिले, यावेळी संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लक्ष्मण शिरसाठ यांच्यासोबत संदीप जाधव ,सुरेश पाटील ,दिवाकर महाले शालिक चौधरी हे संभाजी सैनिक होते तसेच सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रांताध्यक्ष दिलीप घोरपडे यांनीदेखील या आंदोलनात साथ देऊन पुतळ्या बाबत ठामभूमिका मांडली यावेळी पोलीस प्रशासनातील पोलीस उपनिरीक्षक साठे साहेब गोपनीय शाखेचे गणेश पाटील पंढरीनाथ पवार यांचेसह आठ ते दहा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: