2 मे पासून शाळांना सुट्टी तर 13 जून ला सुरू होणार शाळा…

Read Time1 Minute, 53 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

राज्यातील शाळांना सुट्टी कधी मिळणार या चर्चेला पूर्णविराम लागला असून शालेय शिक्षण विभागाने 2 मे पासून शाळांना सुट्टी जाहीर केली असून नवीन शैक्षणिक वर्ष 13 जून पासून होणार सुरू

राज्यातील शाळा एप्रिल महिनाअखेरपर्यंत सुरू ठेवण्यासंदर्भात काढलेल्या आदेशावरून मागील काही दिवसांपासून वाद निर्माण झाला होता त्यावर आता शालेय शिक्षण विभागाने आपला खुलासा केला आहे. त्यात विभागाने शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करत त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने सुट्टी घेण्याची मुभा दिली आहे तसेच निकालाची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीचा निकाल 30 एप्रिल, रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत शक्य झाला नसल्यास त्यानंतरही लावण्यासाठी सूट देण्यात आली आहे. मात्र निकाल विद्यार्थी पालकांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी शाळांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या या आदेशाचे शिक्षक संघटनांनी स्वागत केले असून पालकांना सुद्धा दिलासा मिळाला आहे.

Happy
Happy
50 %
Sad
Sad
25 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
25 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post संविधान घराघरात पोहचविण्यासाठी संविधान जागर अभियानाचे आयोजन
Next post स्त्री स्वातंत्र्याचे जनक –विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
error: Content is protected !!
%d bloggers like this: