200 परिवाराची किराणाची सोय,आशेचेद्वार प्रतिष्ठानाची आपुलकी होय.
दौंड(प्रतिनिधी):-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे त्यात भारत ही त्या संकटात आहे त्याच संकटात महाराष्ट्र राज्य ही महराष्ट्रात कोरोनाचे वाढते रुग्ण हा खूप मोठा गंभीरतेचा विषय झाला आहे त्याच्याच अनुषंगाने भारतात आणि महाराष्ट्र लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे .व सर्व उद्योग क्षेत्रात आर्थिक मंदी आली सर्व व्यवसाय ठप्प झालेत लोकांच्या अन्नधान्याची कमतरता भासत आहे त्याच हेतून महाराष्ट्रातील काही स्वयंसेवी संस्था जनतेच्या मदतीसाठी सरसावले आहे.त्यातीलच दौंडमधील ही काही प्रवासी व कामगार अडकले आहेत त्यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत.आशेचेद्वार प्रतिष्ठान, पुणे सामाजिक संस्थेद्वारे दौंड मधील 200 परिवारास किराणा देण्यात आले आहे दि:२/०४/२०२० व ३/०४/२०२० आशेचेद्वार संस्थेचे विश्वास्त श्री:योसेफ पवार.सचिन जाधव ,जितेंद्र लोंढे,प्रदीप लोंढे व प्रशांत खावडिया यामध्ये या सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन किराणा वाटप करत असताना कोरोनापासून घ्यावयाची काळजी यावर जनजागृती केली.नॉर्टन मेमोरियल ख्राईस्ट चर्चचे विश्वास्त श्री:विनय खरात,मोझेस व्हाया,अविनाश चौधरी,पेत्रस डोंगरे,सचिन भिसे,या सर्व सहकाऱ्यांचा मोलाचे सहकार्य लाभले.