अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे नदीकाठच्या राहिवाश्यांचे संसार उध्वस्त झाला,शेतकऱ्यांची शेतीच्या शेती वाहून गेली,अनेक जनावरांचा मृत्यू झाला या पुरामुळे तालुक्याचे खूप नुकसान झाले आता सर्व हळू हळू पूर्व पदावर येत असून पावसाळा जवळ आला आहे,मिशन 500 कोटी जलसाठा च्या टीम ने नदीपात्राच्या स्वच्छता मोहिमेला सुरुवात केल्याने पुन्हा नदीपात्र रुंद होणार असून भविष्यात याचा फायदा नक्कीच तालुकावासीयांना होणार यात शंका नाही,या कार्यासाठी अनेक सामजिक संस्था मदतीसाठी पुढे येऊ लागल्या आहे. मिशन ५०० कोटी लीटर जलसाठा टीमसह पाच पाटील ग्रुप, नगरपालिका अशी मदत साखळीही जोडली
जात आहे.
या ठिकाणी सायकलिंग ग्रुप व शहर पोलिस निरिक्षक के के पाटील यांचे उपस्थित चाळीसगाव सायकल गृप यांच्या दातृत्वातून तितूर नदी छत्रपती शिवाजी पुलापासून ते दयानंद पुलापर्यत च्या तितूर नदी
स्वच्छता अभियानात मशीन भाडे साठी 76 हजार रुपये देत आर्थिक सहभाग नोंदवला. सायकलींगग्रुपमधील प्रितेष कटारिया ,सुरेश मंधानी, शांताराम पाटील, निलेश कोतकर, राजेंद्र वाणी, राम घोरपडे, सोपान चौधरी, निलेश निकम, टोनी पंजाबी, अरूण महाजन, योगेश पवार, यांची दखल घेत नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी लोकसहभागाचे आवाहन मिशनचे प्रमुख मुंबईच्या आयकर विभागातील सहआयुक्त डॉ. उज्वलकुमार चव्हाण यांनी केले आहे. लोकसहभागाचे स्वरूप आले असून दातृत्वासाठी अनेक हात पुढे येऊ लागले आहे.