अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव(प्रतिनिधी)- दिनांक ९ जानेवारी रोजी रात्री सुमारे २.०० वाजण्याच्या सुमारास धुळे कडून चाळीसगाव मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारे एक पिकअप वाहन भोरस फाट्याजवळ रस्त्यात नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याचवेळी मागून येणाऱ्या एका दुचाकीने उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने ॲम्बुलन्स बोलावून जखमीला शासकीय रुग्णालय, चाळीसगाव येथे दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव तौकीर पीरजादे असून ते मालेगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
