अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख(मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- कर्नाटक एक्स्प्रेस, गोवा एक्स्प्रेस,ओखा रामेश्वर एक्स्प्रेस,साकेत एक्स्प्रेस, तुलसी एक्स्प्रेस, धुळे ते पुणे दररोज तर नागपूर ते कोल्हापूर दोन दिवस नवीन रेल्वे गाडी सुरू करण्यासह कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस व भुसावळ देवळाली मेमु ची पूर्ववत वेळ करण्याची मागणी दि ६ रोजी चाळीसगाव रेल्वे स्थानक येथे खासदार स्मिता वाघ यांना रयत सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे,
कर्नाटक एक्स्प्रेस ट्रेन न.१२६२७ / १२६२८ चाळीसगाव रेल्वे स्थानकांवरून दररोज न थांबता धावते कर्नाटक एक्स्प्रेस ला थांबा दिल्यास महाराष्ट्र ची कुलस्वामिनी तुळजापूर येथील तुळजाभवानीचे दर्शन होईल, पंढरपूर येथे विठ्ठल रुख्मिनी चे तसेच तिरुपती येथे बालाजीचे दर्शन होणार असून बंगलोर येथे आय टी हब असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण, नोकरी तसेच दक्षिण भारत दर्शन होणार असून चाळीसगाव ,छत्रपती संभाजी नगर, कन्नड, धुळे जिल्ह्यासह तीन जिल्ह्यातील प्रवाशांना कर्नाटक एक्स्प्रेस ला चाळीसगाव रेल्वे स्थानकांवर थांबा दिल्यास भाविक व प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल,तसेच गोवा एक्स्प्रेस ट्रेन क्र १२७७९ / १२७८० गोवा येथे पर्यटनासाठी नागरिक जात असतात तसेच दिल्ली ला व्यापारी व्यापार करण्यासाठी जात असतात तसेच शिक्षण व नॉर्थ रिजन येथे पर्यटन स्थळ असल्याने चाळीसगाव ,छत्रपती संभाजी नगर, कन्नड, धुळे जिल्ह्यासह तीन जिल्ह्यातील प्रवाशांना नवीन गाड्यांना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा दिल्यास गाड्यांची सुविधा उपलब्ध होईल,कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस डाउन ट्रेन क्र ११०३९ या गाडीची वेळ सकाळी ६ वाजेची असल्याने जळगाव येथे व्यापारी, नोकरदार ,शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी रोज जातात त्यांना पहाटेच्या वेळेमुळे खूपच धावपळ होत असल्याने सध्य स्थितीची वेळ बदलून सकाळी ७ वाजून १० मिनिटांची पूर्ववत वेळ करावी,देवळाली – भुसावळ मेमू ट्रेन क्र ११११३ ची सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांची पूर्ववत वेळ करावी तसेच धुळे ते पुणे जाण्यास प्रवाशांना रेल्वे गाडी नसल्याने नवीन धुळे ते पुणे रेल्वे गाडी सुरू करावी , धुळे ते मुंबई २ वर्षांपासून रेल्वे सुरू केल्याने धुळे जिल्हा आणि चाळीसगाव येथून प्रवाशी प्रवास करत असल्याने रेल्वे विभागाला आर्थिक फायदा होत असल्याने पुणे जाण्यासाठी धुळे ते पुणे रेल्वे सुरू करावी,ओखा रामेश्वर ट्रेन क्र १६७३३ /१६७३४ या गाडीला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा दिल्यास चारधाम यात्रे मधून दोन धाम भाविकांना यात्रा करण्यासाठी ओखा रामेश्वर ही साप्ताहिक रेल्वे गाडीची सुविधा मिळणार असल्याने चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा दिल्यास चाळीसगाव, कन्नड, धुळे,छत्रपती संभाजी नगर येथील प्रवाशांना दोन धाम यात्रा तसेच तिरुपती यात्रेची सुविधा उपलब्ध होईल,साकेत एक्सप्रेस २२१८४ /२२१८३ अयोध्या हे तीर्थस्थळहिंदू धर्माच्या आस्थेचे स्थान आहे, तसेच साकेत एक्स्प्रेस ला प्रवाशांच्या सुविधेसाठी थांबा देण्यात यावा, नागपूर कोल्हापूर डाउन ट्रेन क्र ११४०३ / अप ११४०४ एक्स्प्रेस अकोला – परभणी – लातूर- कुर्डवाडी मार्गे पंढरपूर पुढे मिरज , कोल्हापूर पर्यंत सुरु आहे त्याच रेल्वे गाडीला आठवड्यातुन दोन दिवस नागपूर-भुसावल चाळीसगाव- मनमाड मार्गे दौंड – कुर्डुवाडी – पंढरपूर रेल्वे गाडी सुरू केल्यास खान्देशातील हजारो वारकऱ्यांना विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाचा लाभ होणार आहे, तुलसी एक्स्प्रेस डाउन ट्रेन क्र १२१६५ तसेच पुस्पक एक्स्प्रेस अप ट्रेन क्र १२५३३ , साकेत एक्स्प्रेस ट्रेन क्र २२१८४ या तिन्ही रेल्वे गाड्याना चाळीसगाव रेल्वे स्थानकांवर थांबा मिळाल्यास व्यापारी, नोकरदार, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध होणार आहे,नागपूर मुंबई दरम्यान रोज धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना अतिरिक्त जनरल कोच लावल्यास नाशिक, मनमाड, पाचोरा,जळगाव अपडाऊन करणारे नोकरदार,कामगार , विद्यार्थी व प्रवाशांना प्रवास करणे सुलभ होणार आहे, चाळीसगाव रेल्वे स्थानकांवर न थांबणाऱ्या रेल्वे गाड्याना थांबा मिळवून देण्यासह काही रेल्वे गाड्यांची वेळ बदलण्याची मागणी खासदार स्मिता वाघ यांना चाळीसगाव रेल्वे स्थानक येथे दि ६ रोजी रयत सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे, निवेदनावर रयत सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, रेल्वे प्रवासी संघटनेचे विजय सुरळकर, निलेश सुरळकर यांच्यासह धिरज पवार, मंगेश देठे ,अभिजीत शिंदे, भूषण बोरसे, प्रशांत आजबे, रवींद्र नागणे, दीपक नागणे, सलीम खान, गयास ,इरफान शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत याप्रसंगी नगराध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण, भाजपाचे शहराध्यक्ष नितीन पाटील, नगरसेवक बाळासाहेब पवार, अभय वाघ यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,
