अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) –तालुक्यातील दसेगाव फाट्याजवळ आज दिनांक २ एप्रिल रोजी दुपारी भीषण अपघात घडून एका तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. वाळूने भरलेल्या भरधाव डंपरने ऍक्टिव्हा दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची चर्चा आहे.
या अपघातात डी.फार्मसीचे शिक्षण घेत असलेल्या चंचल आबा लांडगे हिचा जागीच मृत्यू झाला. तिच्यासोबत असलेली मैत्रीण गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मेहुणबारे पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून भरधाव वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.स्थानिकांनी काही काळ रस्ता रोको आंदोलन केल्याचे देखील कळते.
