अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये अनेक खाजगी पंटर धुमाकुळ घालत असून सहा दुय्यम निबंधक कार्यालयातील एका खाजगी पंटरला लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांनी रंगेहात अटक केली असून या कारवाई मुळे शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या खाजगी पंटरांसह त्यांच्या आकांचे धाबे दणाणले आहे.
पिलखोड येथील तक्रारदार हे बिनशेती प्लॉट चे खरेदीखत व सूची क्रमांक २ साठी सह दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात गेले असता तेथे उपस्थित सुनील निकम(नाना) यांनी ९ हजार रुपयांची मागणी केली.तक्रारदार यांनी इच्छा नसताना ५ हजार दिले व उर्वरित रक्कम नकला घेण्यासाठी आल्यावर देण्याचे ठरले या नंतर तक्रारदार यांनी तात्काळ धुळे लाच प्रतिबंधक विभागास संपर्क साधत तक्रार दिली.
त्यानुसार अधिकाऱ्यांनी तक्रारदाराची भेट घेत सर्व माहिती जाणून घेत दिनांक ४ एप्रिल रोजी सापळा रचला आणि पंचांसमोर निकम यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.पण लाच जरी निकम यांनी घेतली असली तरी या लाच मागे कोणी आहे का? कारण लाचेच्या बदल्यात शासकीय काम केले जाणार होते आता निकम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे नेमकी तपास काही माहिती समोर येईल का कारवाई इथेच थांबली याकडे जनसामान्यांचे लक्ष लागूनआहे.
ही यशस्वी कारवाई सचिन साळुंखे,पोलीस उप अधीक्षक, ला.प्र. विभाग, धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी यशवंत बोरसे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. विभाग, धुळे यांच्या सह सापळा पथक पोहेकॉ. राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, पोकॉ. मकरंद पाटील, प्रविण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, चंद्रकांत सैंदाणे, मपोकॉ. रेश्मा परदेशी, पोहेकॉ. सुधीर मोरे, पोकॉ. जगदीश बडगुजर यांनी केली आहे.
खाजगी पंटर वर कारवाई पण यामागील सूत्रधार कोण?चाळीसगाव सहा दुय्यम निबंधक कार्यालयात खाजगी पंटरला लाच स्वीकारताना अटक करण्यात आली,पण यामागे कोणी मुख्य सूत्रधार आहे का? कारण मागील अनेक वर्षांपासून निकम हे कार्यालयात असतात् त्याचे कारण काय? कोणत्याही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून का रोखले नाही आणि कार्यालयात उपस्थित राहून लाच मागण्याऐवढी हिंमत यांच्या कडे आली कशी अश्या अनेक चर्चा शहरात सुरू आहेत,यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होईल की एका खाजगी पंटरचा बळी आणि कार्यालयातील परिस्थिती पुन्हा नवीन पंटरच्या साहाय्याने जैसे थी तैसे राहील?
एकाची हिंमत आणि भ्रष्टाचार समोर..
चाळीसगाव सह दुय्यम निबंधक कार्यालयात एका व्यक्तीने लाच देण्याच्या विरोधात पाऊल उचलले आणि भ्रष्टाचार उघड केला पण शहरात तालुक्यातून येणारे नागरिक हजारो कामांसाठी हजारो लोक गुपचुप लाच देत आहेत,यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये या खाजगी पंटरांची हिंमत वाढत आहे,त्याला कार्यालयातील अधिकारी देखील जबाबदार आहेत कारण जनसामान्यांच्या कामांना रखडविले जाते आणि पंटरांचे काम झटपट केले जाते? यात त्यांचे काही हित देखील असतात ते वेगळे सांगायला नको.
