अधिकार आमचा न्युज नेटवर्क
नान्नज(अहिल्यानगर)- अण्णाभाऊ साठेनगर परिसरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गावातील हातपंपाची तातडीने दुरुस्ती करण्यात आल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामपंचायत नान्नजचे ग्रामपंचायत अधिकारी श्री. जी. एस. पवार यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत त्वरित कार्यवाही करत दुरुस्तीचे काम मार्गी लावले.
या कामासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर येथील कर्मचाऱ्यांनी तांत्रिक सहकार्य करत हातपंप पुन्हा कार्यान्वित केला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नागरिकांची मोठी समस्या दूर झाली आहे.दुरुस्तीच्या कामावेळी अण्णाभाऊ साठेनगर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. अनोप राजू साठे, महादेव अरुण साठे, संदीप साठे, किशोर साठे, विकास साठे, अमोल साठे, राजेंद्र विठ्ठल साठे, आकाश साठे, इस्माईल कुरेशी यांसह अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.दीर्घकाळापासून भेडसावत असलेल्या पाणी समस्येवर प्रशासनाने दाखवलेली तत्परता कौतुकास्पद असून, या कार्यवाहीमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
