अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी-कु:पवन गौतम साळवे
आज दिनांक १७ जून २०२० रोजी जिल्हाधिकारी मा.नवलकिशोर राम यांचे कार्यालयात दौंड ते पुणे आणि पुणे ते दौंड शासकीय, निमशासकीय, बँक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यास अनुमती मिळावी म्हणून बैठक आयोजित करण्यात आली होती त्यांच्या मार्फत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली व मा.जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच सदर सेवा सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले या बैठकीस दौंड चे आमदार राहुल दादा कुल,प्रवासी संघाचे अध्यक्ष प्रेमसुखजी कटारिया,कार्याध्यक्ष गणेश शिंदे, सचिव विकास देशपांडे, अयुब तांबोळी उपस्थित होते.

