मौज मजेसाठी वाहन व मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत परप्रांतीय चोरांना चिंचवड पोलीसांनी केली अटक ०५ मोटार सायकलीसह ०६ चोरलेले मोबाईल केले जप्त
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी सनी घावरी
चिंचवड(प्रतिनिधी)-गेल्या काही महिन्यात पिंपरी चिंचवड परिसरात वाहनचोरीच्या घटना वाढत चाललेल्या आहेत, अश्या परिस्थितीत चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या वाहन चोरी, घरफोडी यांना प्रतिबंध करण्यासाठी
चिंचवड तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पो ना विजयकुमार आखाडे, पोशि नितीन राठोड असे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोशि नितीन राठोड यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चिंतामणी चौकाजवळील मोकळया मैदानात दोन इसम संशयीतरित्या फिरत असून त्यांच्याकडे एक पांढ-या रंगाची अॅक्टीव्हा गाडी आहे. अशी माहिती
मिळताच तात्काळ सदर ठिकाणी जावून सापळा रचून दोन इसमांना ताब्यात घेतले. त्यांची नावे १)
विरेंद्र ऊर्फ बेंदया भोलेनाथ सोनी वय-२२ रा, वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे २) आशिष ओमप्रकाश परदेशी वय-२० रा आकुर्डी पुणे. त्यांना गाडीच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली त्यातील विरेंद्र ऊर्फ बेंदया भोलेनाथ सोनी हा रेकॉर्डवरील असल्याने दोघांनाही चौकशीसाठी पोलीस चौकीस आणुन अॅक्टीव्हा
गाडीची माहिती घेतली असता सदरची गाडी ही चोरीची असून त्याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात
भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
श्री सुधाकर काटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिंचवड पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सपोनि अभिजीत जाधव यांनी आरोपींना वरील गुन्हयात अटक करून कसून चौकशी केल्यावर त्यांनी वाहने चोरी केल्याचे काबुल केले व इतर ठिकाणी केलेल्या चोरीबाबत चौकशी केली असता त्यांनी मौजमजा करण्यासाठी व फिरण्यासाठी निगडी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, येथून मोटारसायकली चोरल्याचे तसेच उघडया घरांमधून चिंचवड,
वाल्हेकरवाडी हददीतून मोबाईल चोरल्याचेही कबूल केले.
वरीलप्रमाणे आरोपींकडून एकुण ०५ मोटारसायकली व ०६ विवीध कंपनीचे मोबाईल असा
एकूण ३ लाख ४० हजार रु. चा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास चालू आहे.
सदरची कामगीरी ही मा.श्री कृष्णप्रकाश सो पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, श्री रामनाथ पोकळे सो अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, श्री मंचक इप्पर सो पोलीस उप आयुक्त परि-१ पिंपरी चिंचवड, डॉ सागर कवडे सो सहा पोलीस आयुक्त पिंपरी विभाग, श्री सुधाकर काटे साो वरिष्ठ
पोलीस निरीक्षक चिंचवड पोलीस ठाणे,श्री विश्वजीत खुळे पोलीस निरीक्षक(गुन्हे) सो चिंचवड पोलीस
ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पो हवा पांडुरंग
जगताप, सहा पो उप-नि मारूती कडु, पो ना स्वप्निल शेलार, पो ना रुषीकेश पाटील, पो ना विजयकुमार आखाडे, पो शि नितीन राठोड, पो शि गोविंद डोके, पो शि अमोल माने, पो शि पंकज भदाणे, पो शि सदानंद रूद्राक्षे यांनी केली आहे.