सामाजिक कामाची पावती विनोद साळुंखे यांची आदिवासी पारधी महासंघ खान्देश विभाग उपाध्यक्ष पदी निवड
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगांव(प्रतिनिधी)दि.२६ सप्टेंबर २०२१ रविवार रोजी वाणी मंगल कार्यालय आझाद चौक पारोळा जिल्हा जळगाव येथे आदिवासी पारधी महासंघ खान्देश विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत मा.विनोद साळुंखे यांची आदिवासी पारधी महासंघ खान्देश विभाग उपाध्यक्ष पदी निवड झाली विनोद साळुंखे चाळीसगाव तालुका उपाध्यक्ष असताना चाळीसगाव येथे भव्य आदिवासी मेळावा,भिमा कोरेगाव विजयस्तंभ पचंवीस फुटी स्तंभ वरुन चाळीसगाव कंराना दर्शन घडविणे कार्यक्रम घेतला कोरोना काळात देखील लोकांना भरपुर मदत केली,रक्तदान शिबिराचे आयोजन केले,कोरोना काळात लसीकरणचे कॅम्प घेतले असे अनेक समाज उपयोगी कार्यक्रमाची दखल घेत मा.विनोद साळुंखे यांची आदिवासी पारधी महासंघ खान्देश विभागीय उपाध्यक्ष पदी मा.आप्पासाहेब साळुंके प्रदेशाध्यक्ष आदिवासी पारधी महासंघ यांच्या कडुन निवड करण्यात आली,यावेळी प्रमुख उपस्थिती मा.बापुजी पारधी सर प्रदेश उपाध्यक्ष आदिवासी पारधी महासंघ,मा.मुकेश साळुंके प्रदेश उपाध्यक्ष आदिवासी पारधी महासंघ,मा.समाधान साळुंके प्रदेश उपाध्यक्ष आदिवासी पारधी महासंघ महाराष्ट्र प्रदेश,बनसीलाल पवार मुख्य सघंटक,मा.दिपक खांदे खान्देश विभाग अध्यक्ष,धुळे जिल्हाध्यक्ष किशोर चव्हाण सर,नाशिक जिल्हाध्यक्ष श्री सुरेश सोनवणे,नंदुरबार जिल्हाध्यक्ष मोहन पारधी,धुळे जिल्हा सचिव रवींद्र चव्हाण सर,सुनिल दाभाडे सर सचिन इतर पदाधिकारी उपस्थित होते