चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. केदारेश्वर महादेव मंदिराचे पुजारी देवीदास जगन्नाथ काकडे (गुरव) व त्यांच्या धर्म पत्नी सौ, मंदाकिनी देविदास काकडे यांच्या हस्ते या मूर्तीची स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी मूर्तीची दिनांक 10 रोजी शहरातील विविध भागातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली, या वेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातुन अमळनेर नंतर दुसरे व चाळीसगाव तालुक्यातील हे पहिले मंदिर असल्याने मंगळग्रहाच्या दर्शनासाठी तालुक्यातील भाविकांना आता अमळनेर येथे जाण्याची गैर सोय टळणार असल्याचे मंदिराचे पुजारी यांनी सांगितले आहे. सदर मूर्ती ही गावातीलच मूर्तिकार दोधा शामराव चौधरी यांनी एका महिन्यात तयार केले या मूर्तीसाठी त्यांनी रेड आग्रा या दगडाचा वापर केला असून या मूर्तीचे वजन जवळपास 500 ते 600 किलो असल्याचे मूर्तिकार यांनी सांगितले. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने शनिवार दिनांक 14 मे रोजी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून. सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आव्हान मंदिराच्या आयोजकांनी केले आहे.