मागासवर्गीय शिक्षकांवर अन्याय करण्याची सोलापूर जिल्हा परिषदेची परंपरा कायम-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-आमच्या प्रतिनिधीशी बोलताना कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की ,सोलापूर जिल्हा परिषदेतील मुजोर अधिकारी व कर्मचारी मागासवर्गीय शिक्षकांवरील अन्यायाची परंपरा जपत असून वंचित ,शोषित पीडित समाज बांधवांना न्याय न देता अन्याय करण्याची परंपरा जपत आहेत असे आरोप महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघातर्फे सोलापूर जिल्हा परिषदेतील मुजोर अधिकारी व कर्मचारी यांचा तीव्र निषेध करण्यात येत आहे .लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांच्या तोंडाला काळे फासण्याचा कार्यक्रम करण्यात येईल याची जिल्हा परिषद प्रशासनाने नोंद घ्यावी .यावेळी निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनावर राहील असेही राज्याध्यक्ष कांबळे यांनी सांगितले आहे.
“जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कावळवाडी येथील शिक्षकाची फाईल महिनाभरापासून तयार आहे व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवली आहे ” असे उत्तर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडून देण्यात येत आहे तर ” फाईल माझ्याकडे आलीच नाही ” असे उत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे देत आहेत .नेमके जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात चाललय काय? हे समजायला मार्ग नाही .वर्तमानपत्रात वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध होऊन तसेच वेळोवेळी निवेदने देऊन जिल्हा परिषदेचे अधिकारी याची दखल घेत नाहीत याचा अर्थ यांना मागासवर्गीयांवर अन्याय करायचा असून ती परंपरा कायम ठेवायची आहे हे स्पष्ट होत आहे .येत्या आठवड्याभरात कावळवाडीच्या अनिल कांबळे या शिक्षकाला न्याय मिळाला नाही तर जिल्हा परिषदेमध्ये अधिकाऱ्यांना काळे फसण्याचे आंदोलन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने करण्यात येणार आहे .