अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी) – 1 जानेवारी 1818 मध्ये महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर ऐतिहासिक लढाई झाली होती.या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी बौद्ध, आंबेडकरी जनता दरवर्षी 1 जानेवारी रोजी जात असते. शिवाय अनेक ठिकाणी भीमा कोरेगावच्या धर्तीवर विजय स्तंभाची उभारणी करून मानवंदना देण्यात येते. या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमीत्त चाळीसगाव येथे रेल्वे स्टेशन बाहेर आज बुधवार 1 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता रेल्वे स्टेशन समोर मानवंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भीमा कोरेगाव विजय स्तंभाची हुबेहूब जवळपास 25 फूट उंचीची प्रतिकृती उभारून आंबेडकर विचारांच्या तसेच पुरोगामी विचारांच्या चळवळीतील काम करणार्या कार्यकर्त्यांनी या विजय स्तंभाच्या प्रतिकृतीला मानवंदना देत अभिवादन केले.
महार रेजीमेंटच्या शूर पराक्रमाचे प्रतिक असलेल्या भीमा कोरेगाव येथील लढावू वारसा जोपासण्यासाठी आंबेडकरी जनतेच्या वतीने शौर्यदिन साजरा करण्यात आला.
यावेळी चाळीसगाव शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर,बौद्ध समाज व आंबेडकरी अनुयायी यांनी विजय स्तंभाला अभिवादन केले.
