संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
अधिकार आमचा विशेष – आज 1 जानेवारी प्रतिभा ताई चव्हाण यांचा वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पण नुसत्या शुभेच्छा न देता त्यांच्या कार्यावर देखील एक नजर टाकने आवश्यक आहे…
आमदार मंगेश दादा चव्हाण ज्यांच्या कार्याची चमक संपूर्ण महाराष्ट्रात आहे. मात्र आमदार मंगेश दादा चव्हाण यांचे कार्य तोपर्यंत पूर्ण होत नाही, जोपर्यंत त्यांच्या कार्यात त्यांच्या धर्मपत्नी प्रतिभाताई चव्हाण यांचे सहकार्य सामील होत नाही.शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा असलेल्या प्रतिभाताई चव्हाण यांचे कार्य खरोखरच आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नीला शोभेल असे आहे.आमदार चव्हाण यांच्या समाजकारणाला प्रेरणा आई वडील आहेच पण त्या प्रेरणेला तेवत ठेवण्याचे कार्य देणारी ऊर्जा प्रतिभा ताई चव्हाण आहेत.खांद्याला खांदा लावत नेहमीच आमदार चव्हाण यांच्या सोबत उभ्या आहेत.पाऊलावर पाऊल ठेवत आमदार चव्हाण यांच्या दूरदृष्टीने समाजकार्य करत आहेत.आमदारांना तर ओळखेची गरज नाही पण तालुक्यात ताईंना कोणी ओळखत नसेल हे पण शक्य नाही.
आमदार चव्हाण हे मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचे खंदे समर्थक आणि गिरिशभाऊ मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांचे निकटवर्तीय यामुळे सहजच आहे की आमदार चव्हाण यांच्यावर पक्षश्रेष्ठींचा खूप विश्वास आहे आणि विश्वास असला की जबाबदाऱ्या देखील वाढतात आणि या जबाबदाऱ्या सक्षम पणे पेलण्यासाठी अनेक वेळा आमदार चव्हाण मतदार संघाची जबाबदारी पूर्ण करून पक्षाच्या जबाबदाऱ्या देखील पूर्ण करत असतात मात्र त्यांची त्यांची थोडीफार असलेली उणीव देखील अपूर्ण राहत नाही.कारण प्रतिभा ताईंच्या माध्यमातून समाजसेवा तालुक्यात निरंतर सुरूच असते,तालुक्यातील जनतेच्या सुखा- दुःखात सहभागी देखील त्या नेहमीच असतात.आमदार चव्हाण यांनी मतदार संघाला परिवार मानले असून सेवा करण्याचा पुरेपूर प्रयत्न ते तर करतातच मात्र त्या प्रयत्नांना भक्कम अशी सात लाभली आहे,ती प्रतिभा ताईंच्या रूपाने लिहायला खूप आहे,पण थोडक्यात जर म्हटले तर “एका यशस्वी पुरुषामागे एक महिला असते आणि हे यशस्वी जोडपे जर समजकरणातून राजकारणात आले तर तालुका विकासाने परिपूर्ण होत यशाची शिखर गाठतो” यात शंका नाही आणि ते सर्व तालुका पाहताच आहे.तालुक्याने देखील आमदार चव्हाण यांना मतदानातून दिलेला विश्वास रुपी बहुमत देखील हे सिद्ध करत आहे.म्हणून तर प्रतिभा ताई चव्हाण म्हणजे आमदार मंगेश दादा चव्हाण यांची प्रतिमाच आहे.
पुनश्च आपणास अधिकार आमचा न्यूज नेटवर्क परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई साहेब….
