संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
नववर्षाच्या स्वागतासाठी चाळीसगाव पोलिसांचा चोख बंदोबस्त
चाळीसगाव(प्रतिनिधी )-शहरामध्ये 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी अनेक नागरिक उत्सुक आहेत. शहरातील सर्व नागरिकांनी शांततेत आणि आनंदाने नववर्षाचे स्वागत करावे, यासाठी चाळीसगाव पोलिसांचा पूर्ण सहकार्य असेल. मात्र, कोणत्याही प्रकारे इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन चाळीसगाव शहर पोलिसांनी केले आहे.
शहरात मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी दोन ठिकाणी ब्रेथ अनालायझर टीम नियुक्त करण्यात आलेल्या असून वाहनचालकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये,अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असे शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी सांगितले आहे.
काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील तीन प्रमुख ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे.पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वाहनांची तपासणी करणार असून कोणत्याही गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी चोख उपाययोजना शहर पोलिसांनी केल्या आहेत.
नववर्ष साजरा करण्यासाठी आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन चा वतीने 8 अधिकारी आणि 50 कर्मचाऱ्यांचा विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे.
सर्व नागरिकांनी सहकार्य करून शांततामय वातावरणात 31 डिसेंबर साजरा करावा. नववर्षाचे स्वागत आनंदाने करा, मात्र कायदा मोडणाऱ्या कृती टाळण्याचे आवाहन देखील शहर पोलिसांनी आहे.चाळीसगाव पोलिस आपल्यासाठी तत्पर असून आपण सर्वांनी पोलिसांच्या निर्देशांचे पालन करून शहराच्या सुरक्षिततेस हातभार लावावा.
