संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- पुन्हा महिला पथकाची पुन्हा धडाकेबाज कारवाई. अवैध गौणखनीज उत्खनन व वाहतुक प्रतीबंध साठी स्थापन केलेल्या पथकातील महिलांनी 3 वाहनांना केले जप्त पुढील कारवाई सुरू.
उपविभागीय अधिकारी चाळीसगाव व तहसीलदार चाळीसगाव यांनी अवैध गौणखनीज उत्खनन व वाहतुक प्रतीबंध करण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकाद्वारे काल रविवार दि.29 डिसेंबर रोजी 3 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
मौजे बोढरे ता.चाळीसगाव या परिसरात अवैध मुरुम वाहतूक करणारे 3 हायवा कंपनीचे 10 चाकी (डंपर) नवीन प्रशासकीय इमारत येथे दुपारी 1 वाजता पुढील कारवाई साठी जमा करण्यात आले.
या पथकात पथकप्रमुख नयना ब्राह्मणे (तलाठी मेहूनबारे),निकिता जाधव (तलाठी बानगाव), रोहिणी घुगे(तलाठी रोहिणी), तेजल खैरनार(तलाठी न्हावे), राहुल आल्हट(तलाठी पातोंडा) यांचा समावेश होता.या पथकात चार महिला व एक पुरुष आहे.
या कारवाई मुळे चाळीसगाव महसुल प्रशासनाची अवैध गौणखनीज उत्खनन व वाहतुक करणा-या वाहनाविरोधात २४ तासात पाचवी कारवाई असून महिला तलाठी या कारवाईत सरस ठरत आहेत.महसुल विभागाच्या महिला पथकाचे अभिनंदन पण या कारवाया महसुल विभागाकडून पूर्वीच होणे अपेक्षित होते.अनेक वेळेस ठेक्यावरील गैरप्रकारांबाबत अनेक वृत्तपत्रांनी बातम्या प्रसिद्ध केल्या, परिसरातील नागरिक सोशल मीडियावर व्यक्त झालीत व महसूल कार्यालयाकडे अनेक तक्रारी केल्या तरीही कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती शेवटी महिला पथकाने करून दाखविले.
यापुढे कारवाईचे सातत्य आणि तोंड पाहून कारवाई न होणे अपेक्षित असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
