संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीला शहर पोलिस प्रशासन व महसूल विभागातील महिला पथकाचा दणका एकाच दिवसात दोन कारवाया.
28 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजून 30 वाजेदरम्यान तालुक्यातील रहीपुरी येथून 4 ब्रास अवैध वाहतूक करणाऱ्या डंपर क्रमांक एम एच 20 सी टी 0377 वर महसूल विभागाच्या तलाठी महिला पथकाने कारवाई करत पुढील कारवाईसाठी प्रशासकीय इमारत येथे जमा केले.तसेच लगेच दुपारी 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास चाळीसगाव शहरात हुडको कॉलनीत शहर पोलिस कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गर्शनाखाली कारवाई करत 1 ब्रास अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली ताब्यात घेत महसूल विभागाला पुढील कारवाई साठी कळविले.यावेळी तात्काळ महसूल विभागाच्या रहिपुरी येथे कारवाई केलेल्या महिला तलाठी पथकाने सदर ट्रॅक्टर ट्रॉली ताब्यात घेत प्रशासकीय इमारत येथे जमा केले.यामुळे एका दिवसात दोन कारवाया झाल्याने अवैध वाळू उपसा व उत्खनन करणाऱ्यांना धक्का लागला असेल पण शहर पोलिसांचे व महिला तालठी पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी हे पथक स्थापन केले असून या पथकामध्ये पथक प्रमुख पुनम पाटील (ग्रा. म.अ. हातले),प्रगती करंजकर (ग्रा. म.अ.वडाळा), अल्का लोहट (ग्रा.म.अ.खडकीसीम),अश्विनी डाले (ग्रा. म.अ.देवळी) व किरण पाटील (ग्रा. म.अ. हिरापुर) यांचा समावेश आहे.
तसेच शहरात शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत पो.हा प्रविण जाधव,पो.हा रविंद्र बच्छे,पो.हा अजय पाटील, पो.शि अमोल भोसले या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
