संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील 2 पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी तर 4 पोलीस नाईकांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती देण्यात आली आहे.
शुक्रवारी दिनांक 27 डिसेंबर रोजी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यातील पोलिसा हवलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी तर 39 पोलीस नाईकांना हवालदार पदी सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती दिल्याचे आदेश निर्गमित केले आहे.या पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये चाळीसगाव येथील सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.त्यात चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण पोलीस ठाण्याचे युवराज बंडू नाईक,अजय तुकाराम महाजन या दोन्ही पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी तर ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रविण डिगंबर पाटील,अक्रम मुबारक बेग तसेच शहर पोलीस ठाण्याचे भटू भाऊसाहेब पाटील, रविंद्र प्रल्हाद पाटील असे एकूण चार पोलीस नाईकांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती देण्यात आली आहे.
पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांना अटी व शर्तीच्या अधीन राहून सध्याच्या नेमणुकीच्या ठिकाणीच सहाय्यक फौजदार व हवालदार या संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे.
