संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरात गेल्या काही महिन्यात छोट्या मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. यात अनेक तरुण आणि व्यवसायिक गंभीर जखमी झाले असून काही प्राणांना मुकले आहेत याचे कारण म्हणजेच चाळीसगाव शहरात विविध ठिकाणी मोक्याच्या जागेवर लावल्या जात असणारे मोठमोठे होर्डिंग जाहिरात बॅनर असल्याचे शहरीवासीयांमधून चर्चिले जात आहे.अनेक वाहनधारकांचे या बॅनर्समुळे लक्ष विचलित होते तसेच मोठ्या वाहनधारकांना छोटे दुचाकीस्वार व वाहने दिसत नसल्यामुळे अपघात होत आहेत, हे अपघात टाळण्यासाठी या अनाधिकृत होर्डिंगसवर त्वरित कारवाई करावी.
तसेच यापुढे असे होर्डिंग लागू नये व शहरातील प्रमुख असलेल्या चौकांमध्ये म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज चौक, वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती, नागर रोड चौफुली, सदानंद हॉटेल चौक, राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज चौक, आनंदीबाई बंकट हायस्कूल चौक, अशा मुख्य रहदारीच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक टाकावेत अशा आशयाची मागणी करणारे निवेदन आज श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेने च्या माध्यमातून नगरपालिका मुख्याधिकारी चाळीसगाव तसेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आले आहे या निवेदनाची दाखल घेऊन त्वरित कारवाई न करण्यात आल्यास पुढील आंदोलन तीव्र करण्यात येईल अशा इशाराही देण्यात आला आहे यावेळी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे विरेंद्रसिंह(टोनु) राजपूत,दिलीप आबा घोरपडे, प्रेमसिंह राजपूत, सिद्धार्थ राजपूत, दिपक पाटील, सरदारसिंह राजपूत,निलेश राजपूत, करण राजपूत, किशोर राजपूत, सौरभ राजपूत, करण पवार, सुनील बिडे, सागर परदेशी, विकी परदेशी, अमोल पवार, ललित पाटील, अमोल लवटे, प्रशांत चव्हाण, आदी उपस्थित होते
