संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
जळगांव(प्रतिनिधी)- शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे रुजू झाल्या पासून पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी अनेक गुन्ह्यांचा तपास करून गुन्हेगारांना अटक करत गुन्हे उघड केले आहेत,त्या कार्याची पावती म्हणून दि १३ फेब्रुवारी रोजी जिल्हा अधीक्षक कार्यालय येथे जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी रोख बक्षीस देत एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कौतुक केले आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी या महिन्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माननीय पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी त्यांचा गौरव केला आहे. या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना रोख पारितोषिक देण्यात आले.हे पारितोषिक देऊन एमआयडीसी पोलिसांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचा सन्मान करण्यात आला आहे.पोलीस दलाच्या अशा उपक्रमांमुळे समाजातील सुरक्षा आणि कायद्याची अंमलबजावणी सुधारण्यास मदत होते सोबतच अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्साह देखील वाढत असतो.
