
संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
भडगाव(प्रतिनिधी)-तालुका उर्दू एज्युकेशन सोसायटी नोंदणी क्रमांक.इ /१३९ जळ या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी संस्थेच्या कार्यालयात अँग्लो उर्दू हायस्कूल येथे संस्थेचे अध्यक्ष हाजी जाकीर शेख अलाउद्दीन यांच्या अध्यक्षतेत नुकतीच पार पडली.
या सभेत संस्थेच्या दिलेले अजंटेनुसार विषयांवर सखोल चर्चा झाली आणि महत्वाचे निर्णय घेण्यात आले. सभेला १३३ पैकी ०५,सभासद मयत असून अंदाजे ८० ते ८५ सभासद उपस्थित होते.
सभेचे वेळ सकाळी ११सुरु होऊन दुपारी १२-१५वाजता संपन्न झाली या सभेत महत्वाच्या विषय म्हणून २०२५ ते २०३० या कार्यकाळ साठी कार्यकारी मंडळ ची निवड करण्यात आली यात उपस्थित सभासदांपैकी १७ इच्छुक सदस्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या सभेचे सर्व कामकाज संस्थेचे सचिव अमानुल्ला खान अहमद खान यांनी पाहिले
नवीन कार्यकारी मंडळाची निवड संस्थेसाठी खूप महत्वाची आहे. नवीन मंडळ संस्थेच्या विकासासाठी नवनवीन योजना तयार करेल आणि संस्थेला पुढे घेऊन जाईल, अशी अपेक्षा संस्थेचे सचिव व सभा अध्यक्ष आणि सर्व सभासदांनी नवीन कार्यकारी मंडळाला शुभेच्छा दिल्या