
संपादक गफ्फार शेख (मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहर पोलीस स्टेशनमार्फत दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये एस.टी. चालकाला शिक्षा.आज दि. १० मार्च २०२५ रोजी मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चाळीसगाव न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागला. गुन्हा गु.र.नं. ४७८/२०२२ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४(अ), २७९, ३३८, ४२७ आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये खटला चालविण्यात आला होता.
या खटल्यात आरोपी मच्छिंद्र मधुकर देवरे याने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने एस.टी. वाहन चालवून करगाव येथील मोटारसायकलस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे सिद्ध झाले. मा. न्यायदंडाधिकारी श्री. एस.डी. यादव यांनी आरोपीला दोषी ठरवून भा.दं.वि. कलम ३०४(अ) अन्वये एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा, कलम २७९ अन्वये ०३ महिने शिक्षा आणि एकूण ०६ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास अधिकची ०६ महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रकरणात सरकारी अभियोक्ता श्री. रमेश खंडु माने यांनी प्रभावी युक्तिवाद करून महत्वपूर्ण साक्षीदार तपासले. त्यांच्या सहकार्याला सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री. शशिकांत शिवाजी माने, श्री. मनोज विजय माने आणि वि. सहाय्यक सरकारी अभियोक्ता चेतना पी. कलाल यांचा पाठिंबा होता. साक्षीदारांचे समन्वय व न्यायालयीन कार्यवाहीसाठी पैरवी अधिकारी पो.कॉ. ३३०२ कुंदन भास्कर अडकामोल (मेहुणबारे पोलीस स्टेशन) आणि पैरवी अधिकारी पो.हे.कॉ. ३१५५ सुनिल यशवंत खैरनार (चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन) यांनी मदत केली. लिपीक श्री. प्रशांत कुळकर्णी यांनीही या प्रकरणात सहकार्य केले.
या खटल्याच्या प्रभावी पाठपुराव्यासाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील आणि आता असलेले पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी विशेष प्रयत्न घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळे या प्रकरणात न्याय मिळू शकला.