उपसंपादक रोहित शिंदे
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
वर्धा(वृत्तसेवा)- दिनांक 16 मार्च 2025 रोजी वर्धा जिल्हा समता सैनिक दलाच्या वतीने एक दिवसीय बौद्धिक प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. या प्रशिक्षण कार्यशाळेत वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या तालुक्यातील महत्त्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते. या कार्यशाळेचा मुख्य विषय होता ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिजन, मिशन आणि आम्ही भारताचे लोक ‘ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय मार्शल धम्मा कांबळे सर समन्वयक केंद्रीय कोअर कमिटी समता सैनिक दल भारत हे होते. वर्तमानात समता सैनिक दलाचे कार्यकर्ते गावागावात निर्माण करण्यासाठी काय उपाययोजना करणे गरजेचे आहे यावर या कार्यशाळेत चिंतन कऱण्यात आले. गटचर्चा आणि प्रश्नोत्तरे या माध्यमातून पुढील कामाची दिशा ठरविण्यात आली. वर्धा जिल्ह्यात मिशन म्हणून काम करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते जोमाने काम करणार असे आश्वासन या कार्यशाळेचे अध्यक्ष मा. मार्शल दिलीप चक्रे (अध्यक्ष – वर्धा जिल्हा) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. सदर कार्यशाळेला जिल्हयातील ६० ते ७० कार्यकर्ते उपस्थीत होते. या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी केंद्रीय संघटक मार्शल संजय ओरके, राज्य संघटक मार्शल मधुरंद नांदेकर , मार्शल सुनील रामटेके, मार्शल राजेंद्र गणवीर, मार्शल सुशील बांगर, मार्शल धर्मेंद्र अंबादे इत्यादी वर्धा जिल्हयातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
