उपसंपादक रोहित शिंदे
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या युवक शाखेच्या शहराध्यक्षपदी ऋषिकेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब संजयजी पवार आणि कार्याध्यक्ष योगेश देसले यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमात युवक प्रदेश सरचिटणीस कुशल देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष निशांत चौधरी, सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष किशोर जाधव आणि तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग खुशाल मोरे उपस्थित होते.
ऋषिकेश देशमुख यांच्या नियुक्तीद्वारे पक्षाच्या युवक शाखेला नवीन दिशा मिळेल आणि युवकांमध्ये पक्षाची विचारधारा पसरविण्यासाठी त्यांनी कार्यक्रम राबवावे असे जिल्हाध्यक्ष पवार यांनी यावेळी सांगितले.देशमुख यांनी देखील पक्ष वाढीसाठी पक्षाच्या ध्येय धोरणावर चालत तळागाळातील घटकापर्यंत पक्ष पोहोचविण्याचे व त्यांच्या समस्या सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
