संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यात वाळू माफियांच्या अवैध उपसा आणि वाहतूकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे.या पार्श्वभूमीवर,दिनांक 23 मार्च रोजी रात्री अंदाजे 1 वाजता शहर सर्कल पथकाने जामदा येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई केली.
शहर सर्कल दाभाडे व पथकातील निलेश अहिरे आणि मेन आप्पा यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर्स जामदा गावात पकडले. कारवाई सुरू असताना त्या ठिकाणी तलाठी झाडे आप्पा आणि राठोड आप्पा यांनी गोंधळ घालून ट्रॅक्टर्स सोडण्याचा पथकावर दबाव आणला असल्याची दबक्या आवाजाने नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.मात्र कर्तव्यदक्ष सर्कल दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कोणाचाही दबाव न स्वीकारता कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.आणि पुढील दंडात्मक कारवाईसाठी प्रशासकीय इमारत येथे ट्रॅक्टर जमा केले आहे.त्यांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून अशा कारवाईंमुळे अवैध वाळू उपसा व वाहतुकीला आळा बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
कारवाईत हस्तक्षेप का?
नागरिकांमध्ये तलाठी झाडे यांनी कारवाईत हस्तक्षेप केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असून,एका कर्मचाऱ्याने दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करणे योग्य आहे का? हस्तक्षेपामागील हेतू वाळू माफियांशी हित संबंध असल्याचा संशय निर्माण करणारा आहे?अशा घटनांमुळे महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत.या चर्चेचे गांभीर्य लक्षात घेता तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सखोल चौकशी करून तलाठी झाडेंवर कारवाई करावी.जेणेकरून प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित राहणार नाही.
अवैध वाळू उपसा आणि वाहतूक थांबवण्यासाठी कडक कारवाई देखील आवश्यक असून या बाबतीत त्वरित पावले उचलावीत अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.
सर्कल तलाठी ची जबाबदारी
सर्कल,तलाठी हे गाव स्तरावर काम करणारे महसूल विभागातील एक महत्त्वाचे पद आहे.यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात त्यात महत्वाची जबाबदारी म्हणजे अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी पथकाने प्रयत्न करणे मात्र यांच्या कडूनच कारवाईत हस्तक्षेप होत असेल तर म् अवैध वाळू उपसा व वाहतूक थांबणार तरी कशी आणि कधी….
